रामफळ-सीताफळ रोपांसाठी सीडबॉलची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST2021-06-06T04:15:13+5:302021-06-06T04:15:13+5:30
विजय टाकेकर यांचा लातुरात सत्कार लातूर : शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लातूरमधील क्रांतिज्योती सेवाभावी संस्था व मित्र ...

रामफळ-सीताफळ रोपांसाठी सीडबॉलची निर्मिती
विजय टाकेकर यांचा लातुरात सत्कार
लातूर : शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लातूरमधील क्रांतिज्योती सेवाभावी संस्था व मित्र परिवाराच्या वतीने विजय टाकेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रांतिज्योती सेवाभावी संस्थेचे सचिव संजय क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते बालाजी बादाडे, दुष्यंत भोजने, परशुराम माळी, केशव जगताप, अनिल सुरनर, विक्रम टाकेकर, विनोद टाकेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
हरंगूळ खु. येथे पर्यावरणदिनी वृक्षारोपण
लातूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशाला हरंगूळ खु. येथे गटशिक्षणाधिकारी धनराज गित्ते व केंद्रप्रमुख इक्राम तांबोळी यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामविस्तार अधिकारी आशा उत्सुरगे, मुख्याध्यापक राजकुमार कांबळे, अविनाश भोकरे, शिक्षक प्रकाश जाधव, राजकन्या गंभिरे, तुळशीराम शेळके, प्रदीप कमठाणे, विवेक डोंगरे, उल्का गुडे, सिद्दिकीबानू सत्तारी, मीना निलंगेकर, शशिकला कवठे, रत्नप्रभा वाघमोडे, आम्रपाली वाघमारे, मीना भोकरे, ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख उपस्थित होते. सूत्रसंचालन अण्णा नरसिंगे यांनी केले. आभार प्रकाश जाधव यांनी मानले.