मूग व उडीद - २५ जुलै, संकरित कापूस, सुधारित कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका व तूर - ३१ जुलै आहे. सदर तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा असून क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपूर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर १५ दिवसात करता येईल, त्यासाठी अंतिम तारखेची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. क्षेत्र नोंदणीकरिता बीजोत्पादक संस्थांनी प्रस्तावासोबत बीजोत्पादक संस्थेचा परवाना, बीजोत्पादक संस्था प्रतिनिधीचे अधिकार पत्र, जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी यांच्यासह करण्यात येणारा रुपये ५०० च्या बंधपत्रावरील करारनामा, स्त्रोत बियाणे खरेदी बिल, स्त्रोत बियाणांचे मूळ मुक्तता अहवाल, स्त्रोत बियाणे पडताळणी अहवाल, बीजोत्पादक शेतकऱ्याचा स्वाक्षरीत व परिपूर्ण माहिती भरलेला विहीत नमुन्यातील अर्ज, बीजोत्पादकाचे महसुली दस्तावेज (७/१२, ८ अ) बीजोत्पादकाचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था आणि बीजोत्पादकामधील करारनाम्याची प्रत. स्त्रोत बियाणे वाटप अहवाल, गाव / पीक व दर्जानिहाय बीजोत्पादकाच्या विहीत प्रपत्रातील याद्या ४ प्रतीत इत्यादी कागदपत्रासह क्षेत्र नोंदणीचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सादर करावेत, जेणेकरून त्यांना देय असलेल्या अनुदानाबाबत कृषी विभागास कार्यवाही करणे सोयीस्कर होईल. यासंदर्भात सविस्तर आवश्यक त्या माहितीसाठी जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी लातूर या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन बीज प्रमाणिकरण यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणी प्रस्ताव मुदतीत सादर करणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST