एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभराेसे, काेराेनाकाळात हाल ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:19+5:302021-07-25T04:18:19+5:30

एकही पाेलीस ठाण्यात नाेंद नाही... गांधी चाैक पाेलीस ठाणे... लातुरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नेकमे किती वृद्ध एकटे ...

The security of the elderly living alone is in full swing. | एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभराेसे, काेराेनाकाळात हाल ।

एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभराेसे, काेराेनाकाळात हाल ।

एकही पाेलीस ठाण्यात नाेंद नाही...

गांधी चाैक पाेलीस ठाणे...

लातुरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नेकमे किती वृद्ध एकटे राहतात, याचीच माहिती उपलब्ध नाही. सध्याला याबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

शिवाजीनगर पाेलीस ठाणे...

लातूर शहरातील शिवाजीनगर पाेलीस ठाण्याकडेही वृद्धांची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, तक्रार आल्यानंतर मुलांना बाेलावून समज दिली जाते. सध्याला सर्वेक्षण सुरू आहे.

एमआयडीसी पाेलीस ठाणे...

लातूर शहरातील एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतही वृद्धांची संख्या माेठ्या प्रमाणावर आहे. काैटुंबिक वादातून वद्धांचा छळ केला जात असल्याचे समाेर आले आहे. मात्र, वृद्धांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही.

वृद्ध म्हणतात...पाेलिसांकडून विचारणा नाही...

लातूर शहरासह जिल्ह्यातील वृद्धांची संख्या माेठी आहे. त्यांचे प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. पैसा, संपत्ती आणि वाटणीच्या कारणावरून मुला-मुलीं, जावयाकडून छळ केला जाताे. घरातील वाद असल्याने बाहेर कुठे फारसे बाेलता येत नाही. मात्र, छळ सहन नाही झाल्यास वृद्ध पाेलीस ठाण्यात धाव घेतात. त्यांच्याकडूनही विचारणा हाेत नाही.

- अमृतराव जाधव, ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर्सचे प्रश्न वेगवेगळे आहेत. अनेक कुटुंबात वृद्ध मंडळी एकांतात जीवन कंठित आहेत. त्यांच्या समस्या साेडविण्यासाठी फारसे काेणी पुढे येत नाही. या काळात आजारपण अधिक त्रस्त करणारे असते. शिवाय, काही कुटुंबात मुले-सुनांकडून त्रास दिला जाताे. याबाबत पाेलिसांत दाद मागितली जाते. वृद्धांच्या समस्या साेडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

- गणपतराव तेलंगे, ज्येष्ठ नागरिक

वृद्धांना न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न...

पंधरा दिवसांपूर्वीच एका बैठकीत सर्वच ठाणेप्रमुखांना आपल्या हद्दीतील वृद्धांची आकडेवारी एकत्रित करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या महिनाभरात हा आकडा उपलब्ध हाेइल. वृद्धांचे प्रश्न साेडविण्यासाठी पाेलीस प्रशासनाचे प्रयत्न राहणार आहेत.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

औषधी आणण्याचीही आता साेय नाही...

अनेक ठिकाणी वृद्ध नागरिक एकटेच राहतात. मुले-मुली, जावई राहत नाहीत. अशावेळी वृद्धांना प्रत्येक बाबतीत परावलंबी रहावे लागते. आजारपणाच्या काळात औषधी आणण्याचीही साेय नाही. या समस्या गंभीर आहेत. शिवाय, सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

Web Title: The security of the elderly living alone is in full swing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.