२८ लाख लाेकांच्या सुरक्षेचा भार २१११ पाेलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:07+5:302021-02-05T06:25:07+5:30

लातूर : जिल्ह्यातील एकूण २८ लाख ५६ हजार ३०० लाेकांच्या सुरक्षेचा भार केवळ २ हजार १११ पाेलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ...

Security burden of 28 lakh lakhs falls on the shoulders of 2111 police personnel | २८ लाख लाेकांच्या सुरक्षेचा भार २१११ पाेलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर

२८ लाख लाेकांच्या सुरक्षेचा भार २१११ पाेलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर

लातूर : जिल्ह्यातील एकूण २८ लाख ५६ हजार ३०० लाेकांच्या सुरक्षेचा भार केवळ २ हजार १११ पाेलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असल्याची माहिती आता समाेर आली आहे. लाेकसंख्येच्या मानाने लातूर जिल्ह्यात असलेली कर्मचारी संख्या अत्यल्प आहे. परिणामी, प्रत्यक्ष कर्तव्यावर असणाऱ्या जवळपास १ हजार ८०० कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. आता राज्याच्या गृहविभागाने भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. राज्यात तब्बल १२ हजार ५०० जागांची भरती हाेणार आहे. या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील पाेलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीला नवीन तरुण पाेलीस कर्मचारी दाखल हाेणार आहेत. जिल्हा पाेलीस दालांतर्गत एकूण २३ पाेलीस ठाण्यांची संख्या आहे. या ठाण्यांसह पाेलीस अधीक्षक कार्यालय, बाभळगाव येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रात एकूण २ हजार १११ पाेलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये उपविभागीय पाेलीस अधिकारी ९, पाेलीस निरीक्षक २१, सहायक पाेलीस निरीक्षक ३७, पाेलीस उपनिरीक्षक ६६, पाेलीस अंमलदार १ हजार ९७८ अशी संख्या आहे. लाेकसंख्येच्या मानाने १ हजार ३५३ लाेकांच्या मागे एक कर्मचारी आहे.

घरफाेडी, दुचाकी चाेरीच्या घटनांत वाढ

लातूर शहरासह जिल्ह्यातील घरफाेडीच्या घटनांनी शतक गाठले असून, यात साेन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखाे रुपयांची राेकड चाेरट्यांनी पळविली आहे. तर दिवसाला किमान दाेन ते तीन माेटारसायकल, इतर वाहनचाेरीच्या घटनांची नाेंद त्या-त्या पाेलीस ठाण्यांत हाेते. अलीकडे चाेरट्यांच्या टाेळ्या सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. एकूण उपलब्ध २ हजार १११ पाेलीस कर्मचाऱ्यांपैकी काही सप्ताहिक सुटी, आजारी रजा आणि इतर कारणांवरून रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वगळता जवळपास केवळ १८०० कर्मचारी कर्तव्यावरच असतात. अर्थात सरासरी एक हजार लाेकांमागे एकच कर्मचारी कार्यरत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

लातूर जिल्ह्यातील घरफाेडी, दुचाकी चाेरीबाबत पाेलीस प्रशासन गंभीर आहे. चाेरट्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. ठाणेस्तरावरील पाेलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घेत ते साेडविण्यावर आपला भर आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी लातूर पाेलीस यंत्रणा सक्रिय आहे.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

Web Title: Security burden of 28 lakh lakhs falls on the shoulders of 2111 police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.