जिजामाता विद्यालयात ‘विज्ञान दिन’ साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:18 IST2021-03-06T04:18:54+5:302021-03-06T04:18:54+5:30

वैरण बियाणेसाठी अर्ज सादर करावेत लातुर : जिल्हयातील सर्व पशुपालकांनी राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत बहुवर्षिय वैरण बियाणे व ...

‘Science Day’ celebrated at Jijamata Vidyalaya | जिजामाता विद्यालयात ‘विज्ञान दिन’ साजरा

जिजामाता विद्यालयात ‘विज्ञान दिन’ साजरा

वैरण बियाणेसाठी अर्ज सादर करावेत

लातुर : जिल्हयातील सर्व पशुपालकांनी राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत बहुवर्षिय वैरण बियाणे व ठोंबे वाटपासाठी अर्ज करावेत. पशुपालकांनी विहित नमुण्यातील अर्ज १५ मार्चपर्यंत नजिकचा पशुवैद्यकीय दवाखाना, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे कडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन.एस.कदम यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

लातूर : आंतराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त केद्रशासनाकडून दिनांक १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वयोवृध्दांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विविध प्रवर्गातील वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.

वयोवृध्दांसाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्था व व्यक्तींनी १० मार्चपर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,लातूर येथे प्रस्ताव सादर करावा असे अवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

शिरशी येथे मार्गदर्शन कार्यक्रम

लातूर : विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने शिरशी येथे महिला बचत गटाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये महिला सशक्तीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी उमेदच्या क्लस्टर समन्वयक सीमा कांबळे यांनी योजनेविषयी माहीती दिली. यावेळी सरपंच कौशल्याताई कांबळे, उपसरपंच नितीन जाधव, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, व महिला बचत गटाच्या अध्यक्ष व महिला उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी गजानन बोयणे यांनी प्रयत्न केले.

सिंधू सूर्यवंशी यांचे परीक्षेत यश

लातूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या सहशिक्षिका सिंधू बालाजी सूर्यवंशी यांनी यश मिळविले आहे. या यशाबद्दल शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, प्राचार्य बी.ए. मैंदर्गी, विजकुमार चव्हाण, बालाजी सूर्यवंशी, दिलीप जाधव, श्रीधर मसलकर, विनोद चव्हाण, विनोद सूर्यवंशी, प्रमोद सुर्यवंशी, श्रेया जाधव, मानसी चव्हाण आदींनी कौतुक केले आहे.

चारचाकी वाहनाच्या धडकेत एक जखमी

लातुर : मेडिकल मध्ये औषध घेण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहन क्र एमएच २५. आर २६२६ ने जोराची धडक दिली. यामध्ये एक जण जखमी झाला असून, फिर्यादी जनार्धन माधव तिळे यांच्या तक्रारीवरून कार क्रमांक एमएमच २५ आर २६२६ च्या चालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एमएलसी जबाबवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चौगुले करीत आहेत.

पैश्याच्या कारणावरून एकास मारहाण

लातूर : पगाराचे राहिलेले पैसे मागितले असता शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना १२ नंबर पाटी श्यामनगर लातुर येथे घडली. याप्रकरणी फिर्यादी राम अन्नाप्पा जाधव यांच्या तक्रारीवरून गोविंद चव्हाण व सोबत असलेल्या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना पाटील करीत आहेत.

मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण

लातूर : मागील भांडणाची कुरापत काढून मनात राग धरून शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना देवणी येथे फिर्यादीच्या घरासमोर घडली. याप्रकरणी फिर्यादी संजय व्यंकट शिंदे (५२, रा. देवणी) यांच्या तक्रारीवरून संजय पंडित एकदरे यांच्याविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कांबळे करीत आहेत.

खर्चासाठी पैसे दे म्हणून मारहाण

लातूर : खर्चासाठी पैसे दे म्हणून शिवीगाळ करून लथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यात दगडाने मारून जखमी केल्याची घटना गगन विहार चौक येथे घडली. याप्रकरणी फिर्यादी अखिलेश नरेंद्र मुंडे यांच्या तक्रारीवरून अविनाश महाराज यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देशमुख करीत आहेत.

Web Title: ‘Science Day’ celebrated at Jijamata Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.