‘कोरोना’पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यात शाळांना आले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:09+5:302021-01-01T04:14:09+5:30
उदगीर : २३ नोव्हेंबर २०२० पासून इयत्ता ९ वी ते १२ वी वर्ग प्रत्यक्ष सुरु झाले असून, ...

‘कोरोना’पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यात शाळांना आले यश
उदगीर : २३ नोव्हेंबर २०२० पासून इयत्ता ९ वी ते १२ वी वर्ग प्रत्यक्ष सुरु झाले असून, शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत. गुरूवारी ४० दिवस पूर्ण झाले असून, एकाही विद्यार्थ्यांना काेराेनाची बाधा झाली नाही. सध्याची विद्यार्थ्यांची उपस्थिती दिलासादायक आहे. तर काेराेनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यात शाळांना यश आले आहे.
उदगीर तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांची एकूण संख्या ११७ आहे. इयत्ता ९ ते १० वर्गातील विद्यार्थीसंख्या १४ हजार १३२ तर इयत्ता ११ ते १२ वी ची ८ हजार ६४८ आहे. कोरोनानंतर सुरु झालेल्या शाळेत ७२ टक्के विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहे. मागच्या शैक्षणिक वर्षात मार्च पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊनचा पर्याय स्विकारला. दरम्यान, दिवाळी नंतर मात्र कोरोना संसर्गाचा धोका हळूहळ कमी होत असल्याचे निदर्शनास येताच शासनाने स्थानिक प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन शाळा कराव्यात, असे आदेश दिले. त्यानुसार शैक्षणिक वर्षात शाळेची पहिली घंटा २३ नोव्हेंबरला वाजली. बघता-बघता या शाळांनी विद्यार्थी उपस्थितीचे ४० दिवस पूर्ण केले आहेत.
धोका टळलेला नाही, काळजी घ्यावी
कोरोनाचा धोका आणखीन टळलेला नाही. एकाही विद्यार्थ्यांना काेराेनाची बाधा झाली नाही. हे आपल्यासाठी दिलासादायक आहे. मात्र यापुढे खुप सतर्क व जागरूक राहून अध्यापनाचे कार्य करणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर व तापमान तपासणी नियमित करूनच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात यावा. असे उदगीर पं. स. चे गटशिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी, विस्तार अधिकारी संजय सिंदाळकर, केंद्र प्रमुख बालाजी धमनसुरे यांनी सांगीतले.
न घाबरता खबरदारी घ्यावी
उदगीर तालुक्यातील सुरु झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यात यश आले आहे. मात्र यात्र यापुुढील काळात अधिकची खबरदारी घ्यावी लागणार नमस्कार आहे. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रूग्णालयात न घाबरता तपासणी करून घ्यावी. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे म्हणाले.