अहमदपुरात वाजली शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:21+5:302021-02-05T06:23:21+5:30

काेरोनामुळे गतवर्षीच्या २७ फेब्रुवारीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थीसंख्या कमी होती. बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी अनास्था दाखविली. ...

The school bell rang in Ahmedpur | अहमदपुरात वाजली शाळेची घंटा

अहमदपुरात वाजली शाळेची घंटा

काेरोनामुळे गतवर्षीच्या २७ फेब्रुवारीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थीसंख्या कमी होती. बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी अनास्था दाखविली. तसेच संमतीपत्र भरून घेणे, शाळेमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था याची चाचपणी पालक करीत होते. तसेच दररोज शाळा स्वच्छ करून घेणे, विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे असे विविध नियम लागू करण्यात आले आहेत.

तालुक्यात एकूण २११ शाळा असून, त्यात १०३ जिल्हा परिषदेच्या, तर खासगी १०८ शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळांत ४ हजार ११२, तर खासगी शाळांत १७ हजार २३२ विद्यार्थी आहेत. एकूण २१ हजार ३४४ विद्यार्थी आहेत. तसेच जिल्हा परिषदेत १४१, तर खासगी शाळांत ३४९ शिक्षक आहेत. पहिल्या दिवशी केवळ दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली होती.

ग्रामीण भागात जनजागृती...

शाळेच्या पहिल्या दिवशी केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यात शहरातील शाळांमध्ये उपस्थिती चांगली होती. मात्र, ग्रामीण भागात उपस्थिती कमी होती. त्यामुळे जनजागृती करण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी नानासाहेब बिडवे यांनी सांगितले.

महिनाभरापासून इयत्ता ९वी ते १२वीपर्यंतचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास झाला नाही. बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी ४० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करून वर्गात सोडण्यात आले, असे यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एम. बिराजदार यांनी सांगितले.

Web Title: The school bell rang in Ahmedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.