शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी; विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST2021-04-01T04:20:20+5:302021-04-01T04:20:20+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ५ वी तील विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च माध्यमिक व ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक ...

शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी; विद्यार्थ्यांना दिलासा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ५ वी तील विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च माध्यमिक व ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती दर वर्षी घेण्यात येते. गतवर्षी ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली होती. यावर्षी मात्र या परिक्षेवर कोरोनाचा चांगलाच परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या परिक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. शिवाय ही परिक्षा यापूर्वी २५ एप्रिल रोजी होणार होती. ती आता २३ मे रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी सांगितली.
असा करावा अर्ज
सदर परीक्षेसाठीचे अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने निश्चित वेळापत्रकानुसार सादर करायचे आहेत. Website: https://www.mscepuppss.in/ या वेबसाईटवर संपूर्ण तपशील उपलब्ध आहे.
कोरोनाचे कारण देत दुस-यांदा पुढे ढकलली परीक्षा...
राज्यभर कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ही शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्याचे बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक अनिवार्य नाहीत, अशी माहिती परिक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आली.
यावर्षीच्या परेक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास ९ मार्चपासून प्रारंभ करण्यात आला होता. त्यानुसार या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर या विभागाने जाहीर केले होते.