शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
3
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
4
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
5
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
7
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
8
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
9
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
10
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
11
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
12
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

बालकांसाठीच्या औषधांचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 5:18 PM

लातूर जिल्हा परिषद : नातेवाईकांना करावी लागतेय पदरमोड

हरी मोकाशे, लातूर : वातावरणातील बदलामुळे बालकांत सध्या सर्दी, खोकला, डेंग्यूसदृश्य आजार वाढले आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी गर्दी होत आहे. परंतु, जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्रांत अँन्टीबायोटिक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बालकांच्या नातेवाईकांना खाजगी मेडिकलमधून औषधांची खरेदी करावी लागत आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २५२ उपकेंद्र आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रातून किमान ७-८ गावातील रुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रात दररोज तपासणी आणि उपचारासाठी किमान ४० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी असते. सध्या पावसाळा असल्याने वातावरणात बदल झाला आहे. नेहमीच्या ढगाळ वातावरणामुळे जंतूसंसर्ग होत आहे. सर्दी, ताप, खोकला, न्यूमोनिया, गॅस्ट्रोसदृश्य आजार, डेंग्यसदृश्य आजार वाढत आहेत. 

दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांत तापाचे औषध वगळता अन्य काही औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले औषध हे खाजगी मेडिकलमधून खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पदरमोड करावी लागत आहे. केवळ डॉक्टरांच्या तपासणी शुल्काची बचत व्हावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जायचे का? असा सवाल रुग्णांच्या नातेवाईकांतून केला जात आहे.

रुग्णकल्याण समित्यांना सूचनाबालकांसाठीच्या काही औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने ही दूर करण्यासाठी खाजगी मेडिकलमधून औषधांची खरेदी करावी, अशा सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्ण कल्याण समित्यांना केल्या आहेत. या समित्या वार्षिक १ लाख ३५ हजार रुपयांपर्यंत औषधांची खरेदी करु शकतात. सध्या बहुतांश रुग्णकल्याण समित्यांनी ५० ते ६० हजारांपर्यंत खरेदी केली असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

६० प्रकारच्या औषधांची मागणीऔषध तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी ६० प्रकारच्या औषधांची मागणी करण्यात आली आहे. त्याची टेंडर प्रक्रियाही शासनाच्या हापकीनकडे पूर्ण झाली आहे. त्यातील काही औषधे उपलब्ध होत आहेत. आठवडाभरात सर्व औषधे उपलब्ध होतील, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयmedicineऔषधंmedicinesऔषधंChildren Dayबाल दिन