देवणी पंचायत समिती सभापतिपदी सविता पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST2021-02-26T04:26:28+5:302021-02-26T04:26:28+5:30
सभापती निवडीसाठी गुरुवारी पंचायत समितीच्या दालनात सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार सुरेश घोळवे होते तर ...

देवणी पंचायत समिती सभापतिपदी सविता पाटील
सभापती निवडीसाठी गुरुवारी पंचायत समितीच्या दालनात सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार सुरेश घोळवे होते तर सहायक म्हणून बी.वाय. केदासे होते. यावेळी सभापतिपदी सविता धनराज पाटील यांची निवड झाली. या निवडीनंतर नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे, चेअरमन दगडू साळुंके, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील जवळगेकर, पृथ्वीराज शिवशिवे, पंचायत समिती उपसभापती शंकरराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैजनाथ अष्टुरे, बाजार समितीचे सभापती बालाजीराव बिरादार, भाजपाचे ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील, बसवराज पाटील, पं.स. माजी सभापती सत्यवान कांबळे, चित्रकला बिरादार, माजी नगरसेवक बाबूराव इंगोले, मच्छिंद्र नरवटे, प्रशांत पाटील दवणहिप्परगेकर, मनोहर पटणे, सोमनाथ बोरोळे, शिवराज बिरादार वडमुरंबीकर, सुधीर भोसले, बाबूराव पाटील आदींची उपस्थिती होती.