सविता धर्माधिकारी यांचा पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST2021-04-04T04:19:43+5:302021-04-04T04:19:43+5:30
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गंत लातूर जिल्ह्यातून शिक्षिका सविता जयंतराव धर्माधिकारी यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ...

सविता धर्माधिकारी यांचा पुरस्काराने गौरव
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गंत लातूर
जिल्ह्यातून शिक्षिका सविता जयंतराव धर्माधिकारी यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी धनराज गिते, विस्ताराधिकारी म्हेत्रे, डायटचे मराठी विभागप्रमुख रमेश माने, सतीश सातपुते, केंद्रप्रमुख तांबोळी, कोळी, रामकिसन सुरवसे आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल सविता धर्माधिकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दयानंद विद्यालयाचा उपक्रम
लातूर : जिल्हा खासगी मुख्याध्यापक मंडळाच्या मार्गदर्शनानुसार कव्हा येथील स्वामी दयानंद विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंचाचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांचा घरीच सराव व्हावा या उद्देशाने शाळेच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करीत सराव प्रश्नसंचाचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रात मास्क, सॅनिटायझरचे वाटप
लातूर : विलासराव देशमुख युवा मंच व लातूर ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने रेणापूर, मुरुड, बाभळगाव ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. मुरुड ग्रामीण रुग्णालयासह निवळी, जवळा बु., चिंचोली ब., चिखुर्डा, गंगापूर, बोरी, भातांगळी, तांदुळजा तसेच औसा तालुक्यातील भादा प्राथमिक आरोग्य केंद्रात मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती विलासराव देशमुख युवा मंचचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, लातूर ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, युवा मंचाचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली.
धनंजय भोसले यांना राज्यस्तरीय पुरस्कार
लातूर : निलंगा तालुक्यातील नणंद येथील ग्रामसेवक धनंजय रामराव भोसले यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण लवकरच मुंबई येथे एका कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भोसले यांनी झाडे लावा-झाडे जगवा अभियानांतर्गत गावात ३ हजार २०० झाडे लावून त्यांचे संगोपन करून गावात हरितक्रांती केली आहे. पाणी फाउंडेशन अंतर्गत गावात राबविण्यात आलेल्या अभियानात त्यांनी सहभाग नाेंदविला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने चाचण्यांवर भर
लातूर : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, आरोग्य विभागाच्या वतीने गृहविलगीकरणासाठी स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी केली जात आहे. तसेच नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.