ईदनिमित्त अत्यावश्यक खरेदीसाठी सवलत दिल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:18+5:302021-05-12T04:20:18+5:30

कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊनचे आदेश दिले होते. याच कालावधीत पवित्र रमजान महिन्यातील ईद असल्याने मुस्लिम बांधवांना अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी ...

Satisfaction with discounts for essential purchases | ईदनिमित्त अत्यावश्यक खरेदीसाठी सवलत दिल्याने समाधान

ईदनिमित्त अत्यावश्यक खरेदीसाठी सवलत दिल्याने समाधान

कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊनचे आदेश दिले होते. याच कालावधीत पवित्र रमजान महिन्यातील ईद असल्याने मुस्लिम बांधवांना अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी निर्बंध शिथिल करून सवलत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह अन्य संघटनांनी केली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी ठराविक वेळेसाठी सवलत दिल्याने जळकोट तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच जिल्हाधिकारी व आ. बाबासाहेब पाटील यांचे कौतुक केले.

शहरातील मुस्लिम कमिटीचे सदर हाजी मैनोद्दीनसाब लाटवाले, सलीम बागवान, अजीज मिस्त्री, मौलाना मोहिद्दीन, मन्यार खाटिक महासंघाचे अध्यक्ष खादर लाटवाले, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, मैनुद्दीन मणियार, माजीद मोमीन, अल्ताफभाई अन्सार तांबोळी, हिदायतुल्ला तांबोळी, शौकत शेख, मुख्याध्यापक सलीम बागवान यांनी समाधान व्यक्त केले.

काळजी घेत खरेदी...

शासन नियमाचे पालन करीत फिजिकल डिस्टन्स राखत आम्ही खरेदी - विक्री करू. कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करीत आरोग्याची काळजी घेऊ. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येईल, असे मुस्लिम बांधवांनी सांगितले.

Web Title: Satisfaction with discounts for essential purchases