सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी सताळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST2021-03-24T04:17:44+5:302021-03-24T04:17:44+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यकारिणी गठीत करण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि समाजबांधवांची बैठक भन्ते नागसेन ...

सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी सताळकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यकारिणी गठीत करण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि समाजबांधवांची बैठक भन्ते नागसेन बोधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा संकल्प केला आहे.
अध्यक्षपदी नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती गजानन सताळकर, उपाध्यक्षपदी प्रीती भोसले, नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन, माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, सत्यवती गायकवाड यांची निवड करण्यात आली. बैठकीला उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, नगरसेवक ॲड. दत्ताजी पाटील, मनोज पुदाले, समीर शेख, फयाज शेख, सय्यद ताहेर हुसेन, ज्ञानेश्वर आपटे, प्रा. अतुल धावारे, संजयकुमार एकुरकेकर, सूर्यभान कांबळे, किरण शिंदे, जितेंद्र शिंदे, व्यंकटराव पाटील, विद्यासागर डोरणाळीकर, बापूसाहेब कांबळे, मोतीलाल डोईजोडे, धनाजी बनसोडे, शफी हाश्मी, राजकुमार गंडारे, बाबासाहेब सूर्यवंशी, फेरोज पठाण, मुसा पठाण, अतिक शेख, राहुल सोनवणे, सुनील कांबळे, सलीम सय्यद, निवृत्ती भाटकुळे, नामदेव बामणे, सतीश वाघमारे, संदीपान कदम, रणजित पाटील, ऋषी लांडगे, अजय पारखे, मारोती चव्हाण, विजय गुप्ता, राहुल सुतार, गौतम सोमवंशी, विजय भालेराव, प्रदीप जोंधळे, प्रेम तोगरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.