...
धानोरा सरपंचपदी सूर्यकांत मुसळे
औसा : तालुक्यातील धानाेरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सूर्यकांत मुसळे तर उपसरपंचपदी शंकर कोळपे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी दहिरे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक पार पडली. त्यात ही निवड झाली. यावेळी सदस्य पुरुषोत्तम कोळपे, पूजा सोमवंशी, लता हाळे, सुकमार जवादे, सावित्री जन्मले यांची उपस्थिती होती. या निवडीनंतर नूतन पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष साेमवंशी, बेलपान कास्ते, अजित सोमवंशी, मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते.
...
जिल्हा सहकारी बँक शाखेचे उद्घाटन
कासारशिरसी : कासारशिरसी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोसायटीच्या इमारतीत स्थलांतर झाले असून त्याचे उद्घाटन झाले. यावेळी माजी सरपंच विठ्ठल उजळंबे, चेअरमन शिवकुमार चिंचनसुरे, व्हा. चेअरमन गुरुनाथ मेलगिरे, गुलाब धायगुडे, बंडू सावळकर, किरण पवार, चेअरमन प्रभाकर हुलपल्ले, शंकर बरमदे, बरजंग बिराजदार, श्रीरंग हाडोळे, गटसचिव राजेंद्र वेल्हाळ, गोविंद रसाळ, श्याम नाकाडे आदी उपस्थित होते.
...
राचन्नावाडी सरपंचपदी सारिका नंदगावे
चाकूर : तालुक्यातील राचन्नावाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका नंदगावे तर उपसरपंचपदी संतोष चिंचोळे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी नाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. यावेळी बब्रुवान वागलगावे, बाबुराव वागलगावे, प्रभाकर वागलगावे, साधू वागलगावे, संपत वागलगावे, उत्तम वागलगावे, डिगांबर नंदगावे, गुुरुनाथ वागलगावे, मधुकर काळे, पुंडलिक सुरवसे, तलाठी मौला शेख, ग्रामसेवक जनार्दन साबदे, ग्रामसेवक व्ही.डी. जाधव आदी उपस्थित होते.