बंगाल, केरळमध्ये संतोष राम यांचा ‘प्रश्न’ सर्वोत्कृष्ट लघुपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:08+5:302021-04-21T04:20:08+5:30
बंगाल फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने कोलकाता येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या ...

बंगाल, केरळमध्ये संतोष राम यांचा ‘प्रश्न’ सर्वोत्कृष्ट लघुपट
बंगाल फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने कोलकाता येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्येवर आधारलेल्या प्रश्न या लघुपटाला नुकतेच फिल्मफेअर २०२० च्या लघुपट स्पर्धेसाठी नामांकन मिळाले होते. मराठवाड्याशी नाळ असणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी या विषयावर तेथील स्थानिक कलावंतांना घेऊन तयार केलेला हा पहिलाच लघुपट असल्याचे संतोष राम यांनी सांगितले. मूळच्या बीड जिल्ह्यातील व सध्या पुण्यात कार्यरत असणाऱ्या डॉ. गणेश आणि दीपाली सानप या दापत्याने सामाजिक जाणीवेतून त्याची निर्मिती केली असून येथील संतोष राम यांच्या दिग्दर्शनाखाली हा लघुपट तयार केला आहे. वर्षातील काही महिने होणाऱ्या स्थलांतरामुळे मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणापासून मोठा काळ वंचित राहतात. एकूणच तिथल्या ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती, शिक्षकांवरील ताण, वेगवेगळ्या नागरिकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या लघुपटात दिसतो. ऊसतोड कामगार असलेली, प्राथमिक शिक्षणही पूर्ण न केलेली आई आपल्या मुलाला शिकवण्यासाठी वाचनाची क्लृप्ती कशी वापरते हे यात पाहायला मिळते. यापूर्वी वर्तुळ, गल्ली असे लघुपट ही संतोष राम यांनी दिग्दर्शित केलेले आहेत.