संजय स्वामी सेट उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:14+5:302021-04-11T04:19:14+5:30
विषय समिती सभापती, सदस्यांच्या निवडी पुढे ढकलल्या लातूर : कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आपत्कालीन परिस्थिती ...

संजय स्वामी सेट उत्तीर्ण
विषय समिती सभापती, सदस्यांच्या निवडी पुढे ढकलल्या
लातूर : कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे. त्याअनुषंगाने शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे नगर परिषद, नगरपंचायती व महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती व विषय समितीच्या सभापतींसह सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या अवर सचिवांनी हा निर्णय घेतला असून, संबंधितांना याबाबत कळविण्यात आले आहे.
---------------
चाचणी केंद्रास भेट देऊन आढावा
लातूर : सध्या लातूर शहरात कोरोना रुग्णांचा वाढता प्रभाव लक्षात घेता महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी चाचणी केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या सूत्रावरच पहिली लाट थोपविली होती. आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे शहरातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. दररोज शहरात हजारो चाचण्या करण्यात येत असून, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना अलगीकरणात ठेवले जात आहे. दरम्यान, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन महापौरांनी पाहणी केली. क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, डॉ. सुधा राजूरकर यांची उपस्थिती होती.