शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; एकाला अटक, हायवा पकडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 03:43 IST

२५ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थागुशाच्या पथकाची कारवाई

लातूर : वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारा हायवा टिप्पर स्थागुशाच्या पथकाने रात्री उशिरा पकडला असून, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थागुशाच्या पथकाने अहमदपूर हद्दीत केली असून, एकाला अटक केली. याबाबत दाेघांविराेधात अहमदपूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविराेधात जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून रात्री उशिरा अहमदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मार्गावर पाेलिसांनी सापळा लावला. वाळूची अवैध मार्गाने चोरटी वाहतूक करीत असलेला हायवा टिप्पर पकडण्यात आला. यावेळी २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी टिप्परसह एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात पिराजी समृत हाके (वय ३२, रा. हुलेवाडी पो. सावरगाव, ता. लोहा जि. नांदेड), विकास काशिनाथ क्षीरसागर (रा. आडगाव, ता. लोहा जि. नांदेड) या दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला असून, पिराजी हाके याला अटक केली आहे. ही कारवाई लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील पोलिस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, सचिन धारेकर, मनोज खोसे, चंद्रकांत डांगे यांनी केली आहे.

खबऱ्याच्या माहितीनंतर पथकाने रचला सापळा...अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले. त्यानंतर माहिती संकलित करताना खबऱ्याने टीप दिली. याच्या आधारे पोलिस पथकाने अहमदपूर हद्दीत सापळा रचला. चोरट्या मार्गाने अवैधपणे वाळू वाहतूक करणारा टिप्पर पोलिस पथकाने ताब्यात घेतला. त्याची झडती घेतली असता त्यामध्ये वाळू असल्याचे आढळून आले. यावेळी टिप्परसह एकास ताब्यात घेतले आहे. अहमदपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

टॅग्स :sandवाळूmafiaमाफियाPoliceपोलिस