शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

साडेचार कोटी युवकांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण - संभाजी पाटील निलंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 2:04 AM

कौशल्य विकासात महाराष्ट्र अग्रेसर

लातूर : कौशल्यातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असून प्रत्येक वर्षी तीन लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सन २०२२ पर्यंत साडेचार कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य आहे. दरम्यान, गेल्या साडेचार वर्षांत कौशल्य विकासात देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रविवारी दिली.

‘लोकमत’शी बोलताना कौशल्य विकास मंत्री निलंगेकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच राज्य नावीन्यता परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना तसेच उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षांत कौशल्य विकासामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला. रोजगार व स्वयंरोजगार तसेच कौशल्य विकासासंबंधी विविध सेवा देण्यासाठी महाकौशल्य पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

कुशल महाराष्ट्र-रोजगारयुक्त महाराष्ट्र या ध्येयपूर्तीसाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात आले आहे. या योजनेनुसार २०१५ ते २०१६ तसेच २०१८ ते २०१९ या कालावधीत १ लाख ७३ हजार ४६९ प्रशिक्षणार्र्थींना प्रशिक्षण दिले आहे. तसेच १ लाख ६९ हजार ६५८ प्रशिक्षणार्र्थींचे मूल्यमापन झाले आहे. त्यानुसार ६५ हजार २७४ जणांना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त झाले आहेत.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत १५ ते ४५ वयोगटातील शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक, दिव्यांग त्याचप्रमाणे महिला प्रवर्गातील उमेदवारांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले गेले. ज्यामध्ये २ लाख २० हजार १४७ प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यात १ लाख ४६ हजार ९६१ जणांचे मूल्यमापन झाले. त्यामधून ५२ हजार ११० रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त झाले आहेत.

कौशल्य विकास कार्यक्रमांना पंतप्रधानांनी दिली दिशा४कौशल्य विकास कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिशा दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असला पाहिजे, ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. त्यानुसार कौशल्य विकास खात्याने प्रशिक्षण, मूल्यमापन आणि प्रत्यक्ष रोजगार मिळवून देण्यात आघाडी घेतली, अशी माहिती मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.