हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:17+5:302021-06-01T04:15:17+5:30

उदगीर : खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर घसरल्याने शेतकरी येथील रंगराव पाटील खासगी बाजार समितीच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे धाव घेत ...

Sales of gram at guaranteed shopping centers increased | हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री वाढली

हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री वाढली

उदगीर : खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर घसरल्याने शेतकरी येथील रंगराव पाटील खासगी बाजार समितीच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे धाव घेत आहेत. त्यामुळे सध्या आधारभूत खरेदी केंद्रावर हरभऱ्याची आवक वाढली आहे. आतापर्यंत ५ हजार ६७५ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे.

गत पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने खरीप हंगामास काही प्रमाणात फटका बसला. त्यामुळे जलसाठ्यात वाढ होऊन रबी हंगामास त्याचा लाभ झाला. तालुक्यात रब्बीतील ज्वारी, हरभऱ्यासह अन्य पिकांचा पेरा वाढला आहे. तसेच वातावरण चांगले राहिल्याने आणि वेळेवर शेतकऱ्यांनी पिकांना पाणी दिल्याने उत्पन्नही चांगले मिळाले. हरभऱ्याच्या राशी केलेले शेतकरी बाजारपेठेत हरभरा विक्रीसाठी आणू लागले. दरम्यान, बाजारपेठेत आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर असल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला.

केंद्र सरकारने हरभऱ्यास आधारभूत किंमत ५ हजार १०० रुपये जाहीर केली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी रंगराव पाटील खासगी बाजार समितीच्या हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केली. हरभरा विक्रीसाठी १ हजार ५३३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. दरम्यान, खुल्या बाजारपेठेत हरभऱ्यास अधिक दर असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केली.

मागील आठवड्यात केंद्र शासनाने डाळवर्गीय धान्याची व्यापाऱ्यांना परदेशातून आयात करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सर्वच डाळवर्गीय धान्याचे दर कोसळले. त्याचा फटका हरभऱ्यालाही बसला. ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असलेला हरभरा आता बाजारात ४ हजार ६५० दराने विक्री होत आहे. दर घसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, शासनाने हमीभाव खरेदी केंद्रास महिनाभराची मुदतवाढ दिल्याने शेतकरी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी गर्दी करत आहेत त्यामुळे आवक वाढली आहे.

३६५ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी...

उदगीरातील रंगराव पाटील खासगी बाजार समितीच्या हमीभाव खरेदी केंद्रावर एकूण १ हजार ५३३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नाेंदणी केली होती. त्यापैकी केवळ ३६५ शेतकऱ्यांचा ५ हजार ६७५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. अद्यापही १ हजार १६८ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झाला नसल्याचे भास्कर पाटील यांनी सांगितले.

खरिपासाठी पैशांची जुळवाजुळव...

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर हरभऱ्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. खुल्या बाजारपेठेत प्रतिक्विंटलमागे सरासरी ४०० रुपयांचा फटका बसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी आता आधारभूत खरेदी केंद्राकडे हरभरा विक्री करीत असल्याने आवक वाढली आहे. दरम्यान, हरभरा विक्री करून शेतकरी खरिपासाठी पैशांची जुळवाजुळव करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.

===Photopath===

300521\0211img-20210528-wa0017.jpg

===Caption===

रंगराव पाटील खाजगी बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली आहे .याठिकाणी शासनाच्या हमी भावाने हरभरा खरेदी करण्यात येत आहे .

Web Title: Sales of gram at guaranteed shopping centers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.