प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:27+5:302021-03-07T04:18:27+5:30
बाजारपेठेत बटाट्यास मागणी वाढली लातूर : सध्या शहरातील बाजारपेठेत बटाट्यांची आवक वाढली आहे. महिला चिप्स व बटाट्यांपासून अन्य पदार्थ ...

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच
बाजारपेठेत बटाट्यास मागणी वाढली
लातूर : सध्या शहरातील बाजारपेठेत बटाट्यांची आवक वाढली आहे. महिला चिप्स व बटाट्यांपासून अन्य पदार्थ बनवीत असल्याने बटाट्यांना मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारपेठेत १२ ते २० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. आणखी काही दिवस बटाट्यांची आवक वाढून मागणीही राहील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
उन्हाची तीव्रता वाढल्याने फळांना मागणी वाढली
लातूर : गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सकाळी ११ वाजल्यापासूनच उष्णता जाणवत आहे. त्यामुळे सध्या फळांना मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत द्राक्षे, संत्री, अननस, चिकू या फळांची आवक सर्वाधिक असून, दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. त्यामुळे ग्राहक या फळांना पसंती देत आहेत. सफरचंदांची आवक घटली असल्याने दरात मोठी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
शासकीय वसाहतीतील खड्डे बुजविण्याची मागणी
लातूर : शहरातील शासकीय वसाहतीतून एमआयडीसीतील हडको काॅलनी भागात जाणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. मात्र ते व्यवस्थितरीत्या बुजविण्यात आले नाही. दोन ठिकाणी अद्यापही खड्डेच आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहनधारकांचीही कसरत होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
बाजारपेठेत गर्दी
लातूर शहरातील पाच नंबर चौकातील भाजीपाला मार्केटमध्ये सातत्याने गर्दी होत आहे.