सालगड्यांचे वेतन सव्वा लाखांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST2021-03-14T04:18:56+5:302021-03-14T04:18:56+5:30
बहुतांश सालगडी हे परजिल्ह्यातील आहेत. लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. आणि परिसरातील गावात बहुतांश सालगडी परजिल्ह्यातील आहेत. काही पंधरा-वीस वर्षापासून ...

सालगड्यांचे वेतन सव्वा लाखांच्या घरात
बहुतांश सालगडी हे परजिल्ह्यातील आहेत.
लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. आणि परिसरातील गावात बहुतांश सालगडी परजिल्ह्यातील आहेत. काही पंधरा-वीस वर्षापासून येथेच असल्याने हरंगुळ येथे जागा घेत रहिवाशी झाले आहेत. गावातून सालगडी मोजकेच आहेत. हरंगुळ बु. हे लातूर शहरालगत आहे. शिवाय, अतिरिक्त एमआयडीसी हरंगुळ शिवारातील हद्दीत आहे. त्यासाठी या परिसरात विविध प्रकारचे कारखाने आहेत. या कारखान्यात हाताला काम मिळत असल्याने, शेतीतील कामासाठी मजुरांची चणचण भासत आहे. गावातून सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुरांची संख्या अल्प आहे. सालगडी म्हणून काम करण्यापेक्षा दररोज मोलमजुरी करून चारशे, पाचशे रुपये हजेरी कमावणारे बहुतांश मजूरदार आहेत. त्यासाठी सालगडी म्हणून काम करण्यासाठी मजूरच मिळत नाही. आता परिसरातील शेतकऱ्यांना परजिल्ह्यातून सालगडी आणावे लागत आहेत.
उचल म्हणून ५० टक्के रक्कम...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाेलणी झाल्यानंतर तातडीने संबंधित सालगड्याला उचल म्हणून ठरलेल्या रकमेपेक्षा ५० टक्के रक्कम द्यावी लागते. शिवाय, शेतात कुटुंबासह राहण्याची साेय करावी लागते. लातूर जिल्ह्यातील सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुरांची संख्या अल्प आहे. त्यासाठी आता शेतकऱ्यांना शेजारच्या नांदेड, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील मजुरांना आणावे लागत आहे. हे मजूर दरवर्षी कुटुंबासह लातूर जिल्ह्यात दाखल हाेत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मजूरांचे स्थलांतर...
लातूर जिल्ह्यालगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील मुजरांची संख्या लातूर जिल्ह्यात माेठी आहे. बहुतांश सालगडी म्हणून नांदेड जिल्ह्यातील मजूर लातूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गत २० वर्षांपासून हे स्थलांतर हाेत आहे. नांदेड जिल्ह्यातील भाेकर, मुखेड, लाेहा, कंधार, बिलाेली, नायगाव बाजार, देगलूर तालुक्यातील मजुरांची संख्या आहे. एकाच्या ओळखीने दुसरा...अशा पद्धतीने हे कुटुंब राेजगाराच्या शाेधात लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, देवणी, निलंगा, औसा, रेणापूर, चाकूर, जळकाेट आणि लातूर परिसरात दाखल हाेत आहेत. आता दिवसेंदिवस वार्षिक वेतनही वाढत आहे. सध्याला एक ते सव्वा लाखांच्या घरात सालगड्यांचे वेतन गेले आहे.