निलंगा शहरात २४ तासांत मिळाले साेलर मीटरला ‘कनेक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:45+5:302021-03-04T04:35:45+5:30
निलंगा शहरातील जवळपास १० ते १५ ग्राहकांनी साेलर प्लान्ट तयार करून घेतले आहेत. केवळ साेलर मीटरची जाेडणी न मिळाल्याने ...

निलंगा शहरात २४ तासांत मिळाले साेलर मीटरला ‘कनेक्शन’
निलंगा शहरातील जवळपास १० ते १५ ग्राहकांनी साेलर प्लान्ट तयार करून घेतले आहेत. केवळ साेलर मीटरची जाेडणी न मिळाल्याने सदरचे साेलर प्लान्ट गत चार महिन्यांपासून जाग्यावरच धूळखात पडून हाेते. त्याचा भुर्दंड संबंधित ग्राहकांना सहन करावा लागत आहे. याबाबत ग्राहक कुमार एखंडे यांनी महावितरण कंपनीकडे पाठपुरावा केला हाेता. दरम्यान, त्यांनी महावितरणला मुदतीत मीटर देणे हाेत नसेल तर, मीटर मिळेपर्यंत वीजबिल माफ करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली हाेती. याबाबत साेलरमालकांनी महावितरणकडे अनेकदा अर्ज, तक्रारी केल्या. मात्र, कुठलाही फरक पडला नाही. याबाबत लाेकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध हाेताच, अवघ्या २४ तासांत साेलर मीटरला जाेडणी मिळाली आहे.
आठ लाखांचा झाला खर्च...
महावितरण कंपनीच्या अव्वाच्या सव्वा बिलाच्या कचाट्यातून सुटका व्हावी, यासाठी निलंगा शहरात १० ते १५ ग्राहकांनी स्वखर्चातून आपल्या घराच्या छतावर साेलर प्लान्ट उभारला आहे. मात्र, अडीच लाख ते आठ लाखांपर्यंतची गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना गेल्या चार महिन्यांपासून केवळ सोलर मीटर चाचणी करून न मिळाल्यामुळे प्लान्ट धूळखात पडून हाेते. लातूर येथील सोलर मीटर चाचणी मशीन नादुरुस्त असल्याने ग्राहकांची गैरसोय होत होती. याबाबतचे वृत्त लाेकमतमध्ये प्रसिद्ध झाले अन् ग्राहकांच्या साेलर मीटरला जाेडणी मिळाली.