जळकोट येथे तहसीलदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:51+5:302021-03-27T04:19:51+5:30

जळकोट येथील महात्मा फुले चौकात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावर पाेहोचले. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी ...

Sakade to Tehsildar at Jalkot | जळकोट येथे तहसीलदारांना साकडे

जळकोट येथे तहसीलदारांना साकडे

जळकोट येथील महात्मा फुले चौकात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावर पाेहोचले. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध नोंदविण्यात आला. तत्पूर्वी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील दुकाने व प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मन्मथप्पा किडे, विलासराव देशमुख युवा मंचचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, पंचायत समितीचे सभापती बालाजीराव ताकबिडे, नगरसेवक महेश धुळशेट्टे, ओबीसी सेलचे अध्यक्ष तथा सुल्हाळीचे सरपंच शिरीष चव्हाण, मंगरुळचे सरपंच महेताब बेग, सिद्धार्थ सूर्यवंशी, संग्राम नामवाड, राजेंद्र वाघमारे, नामदेव बडे, संजय देशमुख, सुधाकर सोनकांबळे, सत्यवान पाटील, नितीन धुळशेट्टे आदी उपस्थित होते. नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये म्हणून सपोउपनि. बोईनवाड यांनी बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Sakade to Tehsildar at Jalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.