पाणंद रस्त्यासाठी राज्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST2021-02-13T04:19:31+5:302021-02-13T04:19:31+5:30
तालुक्यातील विविध गावांत पाणंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण वाढल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल घरी घेऊन येणे तसेच खते- बियाणे ...

पाणंद रस्त्यासाठी राज्यमंत्र्यांना साकडे
तालुक्यातील विविध गावांत पाणंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण वाढल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल घरी घेऊन येणे तसेच खते- बियाणे शेताकडे घेऊन जाणे कठीण झाले आहे. अतिक्रमणधारक पाणंंद रस्त्यांना मोकळा श्वास घेऊ देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. म्हणून येथील काँग्रेस मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष सुधीर लखनगावे, जिल्हा बँकेचे माजी संचालक लक्ष्मण बोधले, वैशंपायन जागले, हरवाडीकर यांच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन त्यांना तालुक्यातील विविध गावांतील पाणंद रस्त्यांबाबत माहिती देऊन पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, असे साकडे घातले आहे.
१० गावांचा समावेश
तालुक्यातील विविध गावांतील पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक असले तरी प्रामुख्याने शिरूर अनंतपाळ, दैठणा, साकोळ, अंकुलगा (राणी), अजनी (बु), होनमाळ, येरोळ, कारेवाडी, बाकली, उजेड या गावांतील पाणंद रस्त्यांचा समावेश असून लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लवकरच पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्याचे शिष्टमंडळाचे सुधीर लखनगावे यांनी सांगितले.