कर्नाटकातील मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST2021-09-07T04:24:59+5:302021-09-07T04:24:59+5:30

बिदर जिल्हा कर्नाटक क्षेत्रीय मराठा परिषदेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी बेंगलोर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज ...

Sakade to the Chief Minister of the Maratha community in Karnataka | कर्नाटकातील मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

कर्नाटकातील मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

बिदर जिल्हा कर्नाटक क्षेत्रीय मराठा परिषदेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी बेंगलोर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. समाजासाठी महामंडळाची स्थापना करून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्या. महामंडळास १०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी २ कोटींचा निधी द्यावा. धारवाड विद्यापीठात छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने अध्ययन केंद्र सुरू करावे. बसवकल्याण येथे शिवस्मारकासाठी १० कोटींचा निधी द्यावा, तसेच बसवकल्याण येथे समाजबांधवांसाठी सुसज्ज असे मराठा भवन निर्माण करावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळात बिदर जिल्हा कर्नाटक क्षेत्रीय मराठा परिषदेचे अध्यक्ष दिगंबरराव मानकरी, बसवकल्याणचे माजी आमदार मारुतीराव मुळे, जनार्दनराव बिरादार तामगालकर, ज्ञानेश्वर पाटील काकणालकर, दिगंबर पाटील चांदोरी, व्यंकटेश मायंदे बिदर, रावसाहेब बिरादार तामगालकर, शाहुराज पवार सायगावकर, ज्ञानेश्वर पाटील होळसमुद्रकर, कृष्णा ढगे पाटील भालकीकर यांचा समावेश होता.

Web Title: Sakade to the Chief Minister of the Maratha community in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.