साईबाबा जनता सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सगरे; व्हा.चेअरमनपदी सोनू डगवाले
By आशपाक पठाण | Updated: January 6, 2024 20:47 IST2024-01-06T20:47:11+5:302024-01-06T20:47:44+5:30
नविरोध निवड : व्हा.चेअरमनपदी सोनू डगवाले

साईबाबा जनता सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सगरे; व्हा.चेअरमनपदी सोनू डगवाले
लातूर : येथील साईबाबा जनता सहकारी बँकेच्या चेअरमनपदी जे.जी.सगरे यांची तर व्हा.चेअरमनपदी विकास (सोनू) डगवाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शनिवारी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
साईबाबा जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. नवनिर्वाचित संचालक म्हणुन इसरार सगरे, राजेश्वर बुके , पंडितराव धुमाळ, सत्तारखान पठाण, सुभाष मुक्ता, अकबर सगरे, विष्णुदास धायगुडे, ओमप्रकाश गलबले, मेराज पटेल, मौलवी अदिबा, श्रीरंग जटाळ, वैजनाथ कांबळे, श्रीशैल कोरे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. एन . पोतंगले यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित चेअरमन जब्बार सगरे म्हणाले, बँकेला प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सभासदांना सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा देण्यासाठी नूतन संचालक मंडळ काम करेल. लातूर मल्टीस्टेटच्या माध्यमातून मागील ११ वर्षात बँकीग क्षेत्रात चांगली कामगिरी करता आली. यापुढे साईबाबा जनता बँकेत ग्राहकांच्या विश्वासाला पात्र राहून काम केले जाईल. याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार बँकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एन पाटील व कर्मचाऱ्यांनी केला.