राष्ट्रीय कार्यात रोटरी क्लबचे मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:47+5:302021-03-08T04:19:47+5:30
अहमदपूर तालुक्यातील उपक्रमशील आणि तंत्रस्नेही २५ शिक्षकांना राेटरी क्लबच्या वतीने यशवंत संकुलात नेशन बिल्डर अवार्डने गाैरविण्यात आले. यावेळी ते ...

राष्ट्रीय कार्यात रोटरी क्लबचे मोठे योगदान
अहमदपूर तालुक्यातील उपक्रमशील आणि तंत्रस्नेही २५ शिक्षकांना राेटरी क्लबच्या वतीने यशवंत संकुलात नेशन बिल्डर अवार्डने गाैरविण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बाेलत हाेते. जगभरातून ‘पोलिओ’ला नष्ट करण्यासाठी रोटरीचे मोठे योगदान आहे, भूकंपातील कुटुंबाना मदत, पूरग्रस्तांना मदत विविध सामाजिक तसेच शैक्षणिक स्तरावर काेराेनाच्या काळात शिक्षकांना ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचे काम ‘रोटरी’ने केले आहे, असेही ते म्हणाले. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये रंजना क्षीरसागर, वर्षा लगडे, प्रतिभा सांगवीकर, उषा रेड्डी-सुडे, कौशल्या पवार-वाकळे, इंदुमती गुट्टे, लखुपती वाघमारे, छाया काळवणे, नंदा शिंदे, कमल लहाने, नितीन गडवे, सत्येंद्र देशमुख, मुजीब पठाण, संतोष मुंढे, अर्जुन केंद्रे, डॉ. हुसेन सय्यद, संदीप कोटापल्ले, शिवाजी तत्तापुरे, संभाजी आरदवाड, महादेव राचमाळे, महारूद्र होनाळे, बापूराव मुंडे,
एकनाथ कौसे, सदाशिव इरले, लक्ष्मण थोटे आदींचा समावेश आहे. यावेळी ‘कोविड योद्धा’ म्हणून कलाशिक्षक महादेव खळुरे यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नजीब पठाण यांनी केले.
सूत्रसंचालन कपिल बिरादार यांनी केले. आभार प्रा. शिवशंकर पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ‘रोटरी’चे अध्यक्ष नजीब पठाण, सचिव प्रा. शिवशंकर पाटील, धनंजय कोत्तावार, संतोष मद्देवाड, महेंद्र खंडागळे, प्रा. अनिल चवळे, माधव वलसे,
शिवाजी पाटील, ज्ञानोबा भोसले, सचिन करकनाळे, डॉ. नंदकिशोर गुणाले, संजय गोटमवाड, राहुल घाटोळ, डॉ. शिवप्रसाद निजवंते, डॉ. राजेश्वर स्वामी, गोपाल पटेल, विश्वनाथ विळेगावे, अनिल फुलारी, अश्विन आंधळे, धीरेंद्र ढेले, आशिष हेंगणे, डॉ. चंद्रकांत उगीले, भरात इगे, नीलेश मजगे, जीवन कापसे, डॉ. मधुसुदन चेरेकर, गंगाधर याचावाड, वैभव रेड्डी, प्रा. द. मा. माने, कमलाकर सुडे, प्रशांत घाटोळ, प्रा. बालाजी पटवारी, श्रीधर लोहारे, अभिलाष पोकरणा, आदित्य जोशी यांनी अधिक परिश्रम घेतले.