रोटरी क्लब लातूर होरायझनतर्फे एकल महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या, यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष प्रा.डॉ. संजय गवई होते. प्रमुख पाहुणे म्हणून आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी प्रांतपाल डॉ. माया कुलकर्णी, डॉ. मल्लिकार्जुन हुलसुरे, सचिव नीळकंठ स्वामी, प्रा. रंजिता वाघमारे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रवीण पाटील म्हणाले, कोरोनामुळे अनेक गावातील कुटुंबांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कुटुंबाला रोटरी क्लबतर्फे मदत केली जात आहे. माजी प्रांतपाल डॉ. माया कुलकर्णी म्हणाल्या, सर्वांनी कोरोनाबाधित कुटुंबाला आधार देण्याचे कार्य केले पाहिजे त्यामुळे त्या कुटुंबामध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होईल. यावेळी विश्वनाथ स्वामी, प्रा. विद्या हातोलकर, बी. पी. सूर्यवंशी, निर्माल्य ग्रुपच्या मोनिका राठी, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, बाल कल्याण समिती सदस्य ॲड. सुजाता माने, प्रा. मंगल जाधव, नानक जोधवानी, जाबुंवंतराव सोनकवडे, सुभद्रा घोरपडे, व्यंकटेश हंगरगे, वरुणराज सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी प्रांतपाल डॉ. विजय राठी, बी. पी. सूर्यवंशी, सुधीर सातपुते, विठ्ठल कावळे, राहुल बेलकुंदे, मुकुंद कुलकर्णी, संयम गवई यांनी परिश्रम घेतले.
रोटरीमुळे एकल महिलांच्या कुटुंबात सकारात्मक ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:24 IST