मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:05+5:302021-07-14T04:23:05+5:30
लातूर येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालयात आयोजित केलेल्या युट्यूब संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ‘ऑनलाइन शिक्षणातील पालकत्व’ या विषयावर ते ...

मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची
लातूर येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालयात आयोजित केलेल्या युट्यूब संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ‘ऑनलाइन शिक्षणातील पालकत्व’ या विषयावर ते बाेलत हाेते. मुलांना घडविणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे, असे प्रत्येक पालकांना वाटत असते, पण त्यातील पहिली पायरी म्हणजे स्वतः घडणं. या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झालं की, मुलांना घडविता येत नाही. मूल शिकतं म्हणजे नेमकं काय, हे आपण समजून घेतले पाहिजे. एका बाजूला तो पुस्तकी ज्ञान घेत असतो आणि दुसऱ्या बाजुला त्याचे कुटुंब, कुटुंबातील वातावरण, अनुभव, कुटुंबाकडून जन्मजात मिळालेले संचित, संस्कार या सर्वांमधून त्याचे शिक्षण होत असते. माणूस म्हणून घडायला, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवायला हे जीवन शिक्षण उपयोगी ठरते. मूल जास्तीतजास्त घरातल्या लोकांकडून शिकत असते. त्यासाठी पालक म्हणून आपली भूमिका काय असायला हवी, हे समजून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.चेतन सारडा यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव कमलकिशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष जयेश बजाज, अतुल देऊळगावकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रमाकांत स्वामी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागाचे मनोज मुंदडा, अमोल माने आणि राहुल पांचाळ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित हाेते. सूत्रसंचालन भारती गोवंडे यांनी केले.