गावपातळीवरील विकासासाठी ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:06+5:302021-02-05T06:23:06+5:30
तालुक्यातील आटोळा येथे मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांच्या कामाचे व नव्याने बांधण्यात येणाऱ्या सोसायटी इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत ...

गावपातळीवरील विकासासाठी ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची
तालुक्यातील आटोळा येथे मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांच्या कामाचे व नव्याने बांधण्यात येणाऱ्या सोसायटी इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अभिराम पाटील होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तेलंग, घरणीचे सरपंच भानुदासराव पोटे, प्रा. बळीराम भिंगोले, संतोष पाटील, सुधाकर सावंत, अंकुश कानवटे, बालाजी सूर्यवंशी, राहुल सुरवसे, देवानंद पाटील, श्रीराम धनशेट्टी उपस्थित होते.
यावेळी आ. पाटील म्हणाले, राजकारणात आता नवी पिढी आली आहे. त्यांनी सक्षमपणे दूरदृष्टीतून विकासाचा पाया रचला पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने सक्षमपणे जनतेच्या हिताची कामे करावीत. कार्यक्रमाला बिलाल पठाण, बाबूराव साठे, नानासाहेब धनशेट्टी, अजय घोरपडे, उद्धव बिराजदार, सचिन तोरे, पांडुरंग पाटील, धनराज बाचिफळे, गणेश शिंदाळकर, समाधान जाधव, राम भिंगोले, कपिल बावगे, सिद्धेश्वर लोहारे, संगमेश्वर बारुळे, विश्वनाथ कलवले, गंगाधर कुमदाळे, सचिन शेट्टी, शिवहार धुमाळे, दिगंबर गंगापुरे, चंद्रकांत लोहारे, परमेश्वर शेरे, बंडप्पा गंगापुरे, शिवाजीराव रावळे, अन्वर बेग, संतोष कलवले आदी उपस्थित होते.