कोरोनाच्या संकटात आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST2021-01-04T04:17:46+5:302021-01-04T04:17:46+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय आशा दिवस येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका ...

कोरोनाच्या संकटात आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय आशा दिवस येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे होत्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, नायब तहसीलदार बालाजी चितळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय सावंत, डॉ. संतोष बस्तापुरे, डॉ. राजकुमार टकटवले उपस्थित होते.
यावेळी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. तालुका समूह संघटक अरुण तपघाले, गटप्रवर्तक रेणुका शिंदाळकर, अनुराधा खलंग्रे, नंदा मालेवाडे, बालिका समगे, शुभांगी चिवडे यांना उत्कृष्ट कार्य व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सूत्रसंचालन रेणुका सिंदाळकर यांनी केले. तर प्रभाकर डावळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी संतोष किनगावकर, ओमकार सगरे, नरेंद्र भिंगे, सचिन बिराजदार, गजानन ओपळकर यांनी परिश्रम घेतले.
विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव...
आरोग्यसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका सुगंधा वंगलवार यांना प्रथम, शिल्पा पळसकर यांना द्वितीय आणि किरण ढवळे यांना तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम मनीषा कांबळे, द्वितीय सुमती कल्याणी, तृतीय सविता कातपुरे, सामान्यज्ञान स्पर्धेत प्रथम प्रज्ञा शिंदे, द्वितीय सुरेखा जाधव, कवितावाचन स्पर्धेत प्रथम महानंदा सोनवणे, द्वितीय दीपा कांबळे तर पथनाट्य स्पर्धेत प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र नळेगाव, द्वितीय प्राथमिक आरोग्य केंद्र जानवळ यांना व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा गौरव करण्यात आला.