रस्ते, गटारी, दूषित पाण्याचा मुख्याधिकाऱ्यांनी केला पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:20 IST2021-03-31T04:20:13+5:302021-03-31T04:20:13+5:30
चाकूर शहरातील पेट्रोलपंपनजीक पाईपलाईनमधून पाण्याचे फवारे उडतात. तिथेच गटाराचे आणि तुंबलेले पाणी साचलेले आहे. त्याचा प्रभारी मख्याधिकारी मंगेश ...

रस्ते, गटारी, दूषित पाण्याचा मुख्याधिकाऱ्यांनी केला पंचनामा
चाकूर शहरातील पेट्रोलपंपनजीक पाईपलाईनमधून पाण्याचे फवारे उडतात. तिथेच गटाराचे आणि तुंबलेले पाणी साचलेले आहे. त्याचा प्रभारी मख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्याकडून प्रथम स्पॉट पंचनामा करण्यात आला. या दूषित पाण्यामुळे अनेकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. त्यानंतर चाकुरात नव्याने करण्यात आलेल्या पेव्हारब्लॉक रस्त्याच्या कामाचा दर्जा मुख्याधिकारी शिंदे यांना दाखविण्यात आला. सदरचे पेव्हरब्लॉकचे काम निकृष्ट करण्यात आल्याचा आराेप मनसेने केला आहे. या कामाचाही पंचनामा करण्यात आला. यातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्यानंतरही मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. असे मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. भिकाणे म्हणाले. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबतचे आदेश काढण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. चाकूरला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी, तुंबलेल्या गटारी हेही मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शेवटी मुख्याधिकाऱ्यांसोबत चाकूरला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर जात पंचनामा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अजय धनेश्वर, कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, माजी तालुकाध्यक्ष अजित घंटेवाड, अड. ओंकार शेटे, महिला तालुकाध्यक्षा सरस्वती नवरखेले, राम कसबे, दत्ता सूर्यवंशी, तुळशीदास माने, विठ्ठल प्रसाद झांबरे, गणेश चौहान, कृष्णा गिरी, सुरज लोंढे यांची उपस्थिती हाेती.