नागरिकांनी मांडल्या रस्ते, नाल्या, पाण्याच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:05+5:302021-03-06T04:19:05+5:30

सरपंच विजय अंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. १५ व्या वित्त आयोगाचा ...

Roads, drains, water problems raised by the citizens | नागरिकांनी मांडल्या रस्ते, नाल्या, पाण्याच्या समस्या

नागरिकांनी मांडल्या रस्ते, नाल्या, पाण्याच्या समस्या

सरपंच विजय अंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. १५ व्या वित्त आयोगाचा कृती आराखडा तयार करून मंजुरी देण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन, शेळीपालन शेड या वैयक्तिक लाभाच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतरची ही पहिलीच ग्रामसभा असल्याने ग्रामस्थांना उत्सुकता होती. काही ग्रामस्थांनी गावातील रस्ते, नाल्या, पाण्याचे नियोजन, अशा समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्यात येतील, असे सरपंच, उपसरपंचांनी सांगितले. नागरिकांनी घरपट्टी, नळपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केले. ग्रामससभेस उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य नागोराव चिमनदरे, अंकुश आनलदास, सुनील कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Roads, drains, water problems raised by the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.