अहमदपुरातील रस्ते निर्मनुष्य, वाहनेही तुरळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:03+5:302021-04-21T04:20:03+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत नियम कडक केले आहेत. गत आठवड्यापासून संचारबंदी लागू करण्यात येऊन अत्यावश्यक ...

अहमदपुरातील रस्ते निर्मनुष्य, वाहनेही तुरळक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत नियम कडक केले आहेत. गत आठवड्यापासून संचारबंदी लागू करण्यात येऊन अत्यावश्यक सेवेतील दूध, भाजीपाला, किराणा, बेकरी, शेती औजारे, बी- बियाणे, कृषी सेवा केंद्र अशी दुकाने सुरू? ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे वर्दळ दिसून येत होती. दरम्यान, निर्बंध आणखी कडक करीत सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंत सुरू? ठेवण्याचे आदेश दिले. सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे या वेळेच्या कालावधीत खरेदीसाठी काही प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यानंतर मात्र, रस्त्यांवरील नागरिक अत्यंत कमी झाले आहेत. दरम्यान, शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर पोलिसांकडून जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रस्त्यावरील वाहने आवश्यक कामासाठीच आहेत, की नाहीत याची पडताळणी केली जात आहे.
मुख्य बाजारपेठेसह भाजी मार्केटमध्ये शांतता...
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आझाद चौक या भागात जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या ठोक व किरकोळ व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यांच्याकडे मालाची आवक सुरू? असल्याने सकाळी ११ वाजतापर्यंत बाजारात वाहनांची ये-जा होती. मात्र त्यानंतर शांतता दिसून येत होती. दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आडत बाजार दुपारपर्यंत सुरू? होता. बाजार समितीत शेतीमालाचे व्यवहार दुपारी ३ वाजता नंतर बंद झाल्याचे पहावयास मिळाले.
शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील शेती औजारांची दुकाने, बी-बियाणे, खतांची दुकाने सकाळी ११ वाजतापर्यंत सुुरू होती. शेतकऱ्यांनी या वेळेत खरेदी केली. त्यानंतर सर्व दुकाने बंद झाली.