शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

लातूरजवळ क्रूझरचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू, 13 जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 15:20 IST

लातूरमध्ये नांदेड राज्य महामार्गावरील कोळपा पाटीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

लातूर : लातूर-नांदेड महामार्गावरील कोळपा पाटीनजीक रस्त्यालगत थांबलेल्या मालवाहतूक टेम्पोला भरधाव वेगातील क्रूझरने मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिली. त्याचवेळी समोरुन येणारी दुसरी क्रूझरही या दोन्ही वाहनांवर धडकली. या विचित्र अपघातात 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाले असून 13 गंभीर जखमी झाले आहेत.  चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथील रेल्वे स्थानकात उतरलेल्या प्रवाशांना घेऊन लातूरकडे निघालेली भरधाव क्रूझर (एम. एच. २४ व्ही. ११०४) कोळपा पाटीनजीक रस्त्यालगत थांबलेल्या मालवाहतूक टेम्पोला (एम.एच. ०४ सी.जी. २७३६) मंगळवारी (28 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास जोराची धडकली. दरम्यान, त्याचवेळी पंढरपूरहून नांदेडकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या क्रूझरला (एम.एच. १३ बी. एन. २४५४) ही जीप धडकली. झालेल्या या विचित्र अपघातात एकाच जीपमधील 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

मृत व्यक्तींची नावंविजय तुकाराम पांडे ( वय 30  वर्ष, नाशिक)दत्तू बळीराम शिंदे (वय 35 वर्ष, नांदेड)शुभम शरद शिंदे (वय 25 वर्ष, अहमदनगर )उमाकांत सोपान कारुले(वय 45 वर्ष)मीना उमाकांत कारुले (वय 40 वर्ष, लातूर)तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय 35वर्ष, लातूर) मनोज चंद्रकांत शिंदे (  वय 25 वर्ष, लातूर) 

जखमीमध्ये अर्जुन रामराव राठोड (२७ रा. परतूर जि. जालना), शब्बीर राजेखाँ खान (१९ रा. निलंगा जि. लातूर), कृष्णा दौलत मगर (१९ रा. नाशिक), मल्लीकार्जुन गोविंद होडे (३२ रा. गातेगाव ता. जि. लातूर), वैष्णवी धनंजय भालेराव (१८ रा. दिपज्योती नगर, लातूर), मदन विठ्ठल पवार (२३ रा. औरंगाबाद), शेख इम्रान इम्तियाज (१९ रा. चाकूर जि. लातूर), गणेश उमाकांत कासले (१२ रा. रेणापूर नाका, लातूर), ज्ञानेश उमाकांत कासले (११ रा. रेणापूर नाका, लातूर), विद्या धनंजय भालेराव (४२ रा. दिपज्योती नगर, लातूर), रामराव मारोती धुसरे (४९ रा. नाशिक), रविदास जयराम सानप (३४ रा. नवी मुंबई), अजय दयानंद वाघमारे (२४ रा. लातूर रोड ता. चाकूर जि. लातूर) आदींचा समावेश आहे. जखमींवर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  अपघाताची माहिती मिळताच विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे,  सपोनि. पवार, गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे, सपोनि. सत्यवान हाके, सपोनि. महेश गळगट्टे यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. 

एकाच कुटुंबातील 2 जणांचा मृत्यू  या विचित्र अपघातात लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका परिसरात राहणारे उमाकांत सोपानराव कासले (४५ रा. नवीन रेणापूर नाका, लातूर), मिनाबाई उमाकांत कासले (४० रा. नवीन रेणापूर नाका, लातूर), हे जागीच ठार झाले तर त्यांचे दोन्ही मुले गणेश उमाकांत कासले (१२ रा. रेणापूर नाका, लातूर), ज्ञानेश उमाकांत कासले (११ रा. रेणापूर नाका, लातूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. 

वाढदिवसादिवशीच ‘शुभम’वर काळाचा घाला अपघातात ठार झालेला शुभम शरद शिंदे (२४ रा. वेलपिंपळगाव ता. जि. अहमदनगर),  हा लोदगा येथील फिनिक्स अ‍ॅकाडमीच्या फूड टेक्नॉलॉजीला द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. शुभमचा मंगळवारी ( २८ नोव्हेंबर ) वाढदिवस होता. मात्र, काळाने वाढदिवसादिवशीच शुभमवर झडप घातली आहे.  गावाकडून लातूरकडे येत असतानाच झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

टेम्पोचे टायर फुटले होते नळेगावहून लातूरच्या दिशेने सोयबीनचे पोते घेवून निघालेल्या टेम्पोचे (एम. एच. ०४ सी. जी. २७३६) सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पाठीमागील टायर फुटले. त्यामुळे टेम्पो कोळपापाटी नजीक रस्त्यालगत थांबविण्यात आला होता. दरम्यान, टेम्पोत चालक सत्तार उजेडे हे झोपले होते. पहाटेच्यावेळी भरधाव क्रुझर टेम्पोवर धडकल्याने मोठा आवाज आला. झोपेतून उठून पाहतो तर काय विचित्र अपघात झाल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली.

दोन आठवड्यात 17 जणांचा मृत्यू रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या तीन भीषण अपघातात गेल्या दोन आठवाड्यात एकूण १७ जणांचा मृत्यू झाला असून  ३६ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. लातूर-निलंगा मार्गावर दोन अपघात तर लातूर-नांदेड महामार्गावरील मंगळवारी पहाटे अपघात झाला. हे तीनही अपघात केवळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे, खड्ड्यामुळे झाले आहेत. गेल्या २४ तासात लातूर जिल्ह्यात रस्ते अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरNandedनांदेड