उघड्यावरील रोहीत्रामुळे अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:27+5:302021-09-15T04:24:27+5:30

या गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेले खांब नागरिकांच्या घराजवळ आहेत. त्यातच लोंबकळणाऱ्या तारापासून धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तारा ...

Risk of accident due to open rohitra | उघड्यावरील रोहीत्रामुळे अपघाताचा धोका

उघड्यावरील रोहीत्रामुळे अपघाताचा धोका

या गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेले खांब नागरिकांच्या घराजवळ आहेत. त्यातच लोंबकळणाऱ्या तारापासून धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तारा झाडाच्या फांद्या अडकल्या आहेत. वारा, पाऊस आला की एकमेकांना घासून ठिणग्या पडतात. तारा तुटतात किंवा विजगुल जाते. महावितरण अधिकारी, वायरमन व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी रोहित्र तसेच विद्युत तारांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने घेत नाहीत, याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होऊ नये तसेच दुर्घटना घडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असून, यामुळे गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. याचा परिणाम घरातील टीव्ही, फ्रिज बल्ब, संगणक आदी विद्युत साहित्य जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी गणेश नगर भागातील २० दिवस विद्युत प्रवाह बंद झाला होता त्यामुळे नागरिकांची मोबाईल चार्जिंगसाठी धावपळ उडाली. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

नवीन साहित्य बसविण्याची मागणी...

गावात ५५ वर्षापूर्वी वीज आली. तेंव्हाचे विद्युत साहित्य असून खराब व गंज लागलेले असल्याने विद्युत पुरवठ्यात अडथळा येतो. जुन्या तारा, वाकडे खांब, खराब रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Risk of accident due to open rohitra