शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

साहित्याचे दर वाढल्याने सामान्यांचे घराचे स्वप्न भंगणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST

चापोली : राज्य शासनाने महसूल वाढविण्यासाठी गिट्टी, रेती, मुरुमाची रॉयल्टी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकामाच्या खर्चात दुप्पट वाढ ...

चापोली : राज्य शासनाने महसूल वाढविण्यासाठी गिट्टी, रेती, मुरुमाची रॉयल्टी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकामाच्या खर्चात दुप्पट वाढ होणार आहे. परिणामी, सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने गिट्टी, रेती, मुरुमाची रॉयल्टी वाढविण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी जुलैपासून होणार आहे. बांधकाम साहित्यावरील रॉयल्टी वाढविल्यामुळे बांधकामाच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे सामान्यांना घराचे बांधकाम करताना आर्थिक झळ सोसाव्या लागणार आहेत. रॉयल्टी वाढल्यामुळे खदान मालकांनाही फटका बसणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अगोदरच सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. त्यात बांधकाम साहित्यावरील रॉयल्टीत वाढ झाल्यास सर्वसामान्यांना घराचे बांधकाम साहित्य परवडणारे राहणार नाही. आता बांधकाम साहित्याच्या किमतीच वाढणार असल्याने बांधकामाच्या तयारीत असलेल्यांना धसका बसला आहे.

घरकुल लाभार्थ्यांची पंचाईत...

घरकुल लाभार्थ्यांना सध्या मिळणाऱ्या अनुदानात सध्याच घराचे बांधकाम करणे कठीण आहे. त्यात शासनाने बांधकाम साहित्याच्या रॉयल्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढणार आहे. याशिवाय, काही लाभार्थ्यांना घरकुलाचा निधीही मिळाला नसल्याने त्यांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचा फटका लाभार्थ्यांना बसणार आहे.

लाभार्थ्यांत नाराजी...

राज्य शासनाने रॉयल्टीत वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार आहे, तसेच अनेक घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू झाले असून, त्यांना मंजूर झालेल्या अनुदानापेक्षा अधिक पैसा खर्च करावा लागणार असल्यामुळे त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न अधुरे राहते की काय, अशी भीती आहे, अशी प्रतिक्रिया येथील रामेश्वर कंटे यांनी दिली.