खाद्यतेलाच्या दरात वाढ, सामान्य कुटुंब झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST2021-04-08T04:20:06+5:302021-04-08T04:20:06+5:30

ही आहेत दरवाढीचे कारणे... राज्यात बदललेल्या वातावरणामुळे तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सागरी ...

Rising edible oil prices, the average family became bored | खाद्यतेलाच्या दरात वाढ, सामान्य कुटुंब झाले बेजार

खाद्यतेलाच्या दरात वाढ, सामान्य कुटुंब झाले बेजार

ही आहेत दरवाढीचे कारणे...

राज्यात बदललेल्या वातावरणामुळे तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सागरी मार्गाने भारतात येणारे तेलाचे कंटेनर उपलब्ध होत नसल्याची अडचण आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. तेल डबा घेणारे ग्राहक सुटे तेल नेत आहेत. बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम तेलबियांच्या उत्पादनावर झाला आहे. यामुळे खाद्यतेलाचा दर वाढला असल्याचे अहमदपूरातील किराणा व्यावसायिक गंगाराम पळसकर, राजकुमार तत्तापूरे यांनी सांगितले.

बाजारातील खाद्यतेलाचे दर...

आता एक किलो पिशवीचा दर १४० रुपये आहे. आधी हा दर ८० ते ८५ रुपये होता. तर काही कंपन्यांच्या एक किलो तेलाच्या पिशवीचा दर १६० रुपयांवर गेला आहे. आधी १२५ रुपये दर होता. तर १५ किलो तेलाच्या डब्याचा दर १८०० रुपये आहे. तो आधी १३०० रुपये होता. तर काही कंपन्यांच्या डब्याचा दर १८५० रुपयांवर गेला आहे. आधी तो दर १४५० रुपये होता. खाद्यतेल दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत असून, परिणामी, गोरगरिबांच्या अडचणीत वाढत हाेत आहे, दरवाढ कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी लांजी येथील गृहिणी शिलींदरबाई मुंडे यांनी केली आहे.

Web Title: Rising edible oil prices, the average family became bored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.