रिमझिम पावसाने खरीप पिकांना मिळले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST2021-08-22T04:23:20+5:302021-08-22T04:23:20+5:30
लातूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडाे हेक्टरवरील साेयाबीनसह खरिपातील इतर पिके धाेक्यात आली हाेती. मात्र, गत ...

रिमझिम पावसाने खरीप पिकांना मिळले जीवदान
लातूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडाे हेक्टरवरील साेयाबीनसह खरिपातील इतर पिके धाेक्यात आली हाेती. मात्र, गत चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या रिमझिम पावसाने या पिकांना आता जीवदान मिळाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मृगाच्या नक्षत्रावर दमदार पावसाने हजेरी लावली. याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली. कालांतराने पावसाने दडी मारली, त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. जवळपास दाेन आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाने दडी मारली हाेती. आता पुन्हा रिमझिम पावसाने लातूर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. यातून शेकडाे हेक्टरवरील खरिपांच्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. उदगीर, चाकूर आणि जळकाेट तालुक्यांतील वाढवणा बु., किनी यल्लादेवी, मन्ना उमरगा, एकुर्का राेड, सुकणी, इस्मालपूर, कल्लूर, खेर्डा, डाेंगरशेळकी, बेळसांगवी, डांगेवाडी, हाळी-हंडरगुळी, सुकणी, आडाेळवाडी, डाेंग्रज, वडगाव एक्की, माेर्तळवाडी, चिमाचीवाडी, डाऊळ, हिप्परगा, गुडसूर परिसरातील शेतकऱ्यांना सध्याला दिलासा मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर साेयाबीनचा पेरा घेतला जाताे. जवळपास साेयाबीनचे क्षेत्र ७० टक्क्यांवर आहे. त्यापाठाेपाठ खरिपातील इतर पिकेही घेतली जातात. दरम्यान, साेयाबीनचे पीक जाेमात हाेते. मात्र, गत दाेन आठवड्यांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. मध्यंतरी कडक उन्हामुळे साेयाबीनचे पीक आता सुकू लागले हाेते. यंदाच्या हंगामात लागवड खर्चही निघेल की नाही, याबाबत शाश्वती देता येणार नाही. आता शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने वाढ खुंटली आहे. यातून उत्पादनात माेठ्या प्रमाणावर घट हाेणार असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.
यंदाचा हंगाम धाेक्यात...
उदगीर, जळकाेट आणि चाकूर तालुक्यांतील काही भाग डाेंगराळ आहे तर काही भागातील जमिनी चांगल्या प्रतीच्या आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडून साेयाबीन आणि इतर पिकांचा पेरा घेतला जाताे. काही शेतकऱ्यांना पाझर तलावाचे पाणी आहे. त्यामुळे त्यांनी उसाची लागवड केली आहे. यातून हाती चार पैसे खेळू लागतात. बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी काेरडवाहू आहेत. माळरानावर एकच हंगाम घेता येताे. अशास्थितीत यंदाही खरिपातील पिकांची वाढ खुंटली आहे. यातून शेतकऱ्यांच्या पदरी लागवड खर्चही पडेल की नाही, हे सांगणे आता कठीण झाले आहे.