नुकसान भरपाई न देणार्या बियाणे कंपन्याचे परवाने रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST2021-05-07T04:20:42+5:302021-05-07T04:20:42+5:30
खरीप हंगाम २०२१ ची पूर्वनियोजन बैठक ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी त्यांनी सूचना केल्या आहेत. बैठकीस खासदार सुधाकर श्रृंगारे, खासदार ...

नुकसान भरपाई न देणार्या बियाणे कंपन्याचे परवाने रद्द करा
खरीप हंगाम २०२१ ची पूर्वनियोजन बैठक ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी त्यांनी सूचना केल्या आहेत. बैठकीस
खासदार सुधाकर श्रृंगारे, खासदार ओमराजे निबाळकर, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धिरज देशमुख, आमदार अभिमान्यु पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., कृषीविकास अधिकारी गवसाने यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, यावर्षी चांगला आणि वेळेत पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे कृषी विभागाने आत्ताच तातडीने खरीप पेरणीसाठी गुणवत्तापुर्ण बियाण्यांची उपलब्धता करून ठेवणे आवश्यक आहे. रासायानीक खतांचाही गरजेनुसार साठा करून ठेवावा लागेल, मागच्या वर्षी प्रमाणे बियाणे ऊगवले नाही अशा तक्रारी येऊ नयेत म्हणून कृषी विभागाच्या गुणवत्ता तपासणी यंत्रणेने प्रमाणित बियांण्या बरोबरच सत्यप्रत बियाण्याच्या दर्जावर बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. मागच्या वर्षांत ज्या शेतकऱ्यांचे बियाणे ऊगवले नाही त्या अपादग्रस्थ शेतकऱ्यांना पेरणीपुर्वी संबंधित कंपन्या कडून नुकसान भरपाई मिळवुन दयावी, नुकसान भरपाई न देणाऱ्या बियाणे कंपन्याचे परवाने रदद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सर्व सूचनांची नोंद घेवून त्यावर तातडीने कार्यवाही करून आठ दिवसात कार्यअहवाल पाठवा. शेतीशी संबंधित महत्वाच्या विषयावंर जिल्हाधिाकरी यांच्या पुढाकारातून स्वतंत्र बैठकांचे आयोजन करावे, असे निर्देशही पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा...
राष्ट्रीयकृत बॅकांनी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, बियाणे ऊत्पादनाला प्रोत्साहन दयावे, प्रलंबित विज जोडणी पंधरा दिवसात पूर्ण कराव्यात, जिल्हयात वेअरहाऊस संबंधी मास्टर प्लॅन तयार करावा, तालुकानिहाय वैशिष्टयानुसार शेती ऊतपादनाचे क्लस्टर तयार करावे, कृषी सहायकांना सेवेच्या ठिकाणी रहाणे अनिवार्य करावे, सौर पंप उभारणीसाठी नोडल ऑफीसरची नियुक्ती करावी, केरळच्या धर्तीवर भाजीपाल्याला हमीभाव मिळण्यासाठी लातूर जिल्हयाने प्रस्ताव तयार करून राज्यशासनाकडे सादर करावा आदी सुचना पालकमंत्री देशमुख यांनी केल्या.