उदगीर तालुक्यातील वीज प्रश्नांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST2021-02-07T04:18:46+5:302021-02-07T04:18:46+5:30
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, उदगीर मतदारसंघात शेतक-यांना योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा, यासाठी ३३/११ केव्हीचे तीन उपकेंद्र गुडसूर, मादलापूर, काेळखेड ...

उदगीर तालुक्यातील वीज प्रश्नांचा आढावा
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, उदगीर मतदारसंघात शेतक-यांना योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा, यासाठी ३३/११ केव्हीचे तीन उपकेंद्र गुडसूर, मादलापूर, काेळखेड येथे प्रस्तावित करुन मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर ७ उपकेंद्रात ५ एमव्हीचे अतिरिक्त रोहीत्र बसविण्याबाबत प्रस्ताव पाठविले आहेत.पाच उपकेंद्रांच्या रोहित्राची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचबरोबर नवीन वितरण रोहित्र संख्या २५६ राहणार असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय, विजेच्या समस्या महावितरणच्या प्रशासनाने तात्काळ सोडवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीला महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, उदगीर मतदारसंघात शेतक-यांना योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा, यासाठी ३३/११ केव्हीचे तीन उपकेंद्र गुडसूर, मादलापूर, काेळखेड येथे प्रस्तावित करुन मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत; तर ७ उपकेंद्रात ५ एमव्हीचे अतिरिक्त रोहित्र बसविण्याबाबत प्रस्ताव पाठविले आहेत आणि पाच उपकेंद्राच्या रोहित्राची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचबरोबर नवीन वितरण रोहित्र संख्या २५६ राहणार असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय, विजेच्या समस्या महावितरणच्या प्रशासनाने तात्काळ सोडवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीला महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
......................
न्यायासाठी दिव्यांगांचे लातुरात उपोषण
लातूर : अहमदपूर तालुक्यातील मोघा येथील भाऊसाहेब तेलंगे आणि समाधान तेलंगे या दिव्यांगांच्या राहत्या घर आणि जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ते अतिक्रमण तातडीने हटवावे, दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. यावेळी गणपतराव तेलंगे, रामकुमार रायवाडीकर, संजय व्यवहारे, शाम वरियाणी, सूरज पाटील, ॲड. ज्ञानोबा भालेराव, अंगदराव कांबळे, बाबूराव झाकडे, ज्ञानेश कोंडजी, वलीसाहेब शेख, रामदास ससाणे, दिगंबर सूर्यवंशी, सत्यभामा माने, बाबा शेख उपस्थित होते.