पोकरा शेतीशाळेचा परिणाम, शेतकऱ्यांची पावले वळली शेतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:16+5:302021-03-16T04:20:16+5:30

सध्या नैसर्गिकरित्या शेतीच्या बांधावर उपलब्ध असलेल्या कडूनिंबाच्या निंबोळीचा अर्क पाच टक्के कसा तयार करावा, दशपर्णी अर्क तयार करून फवारणी ...

As a result of Pokra farm, farmers turned to agriculture | पोकरा शेतीशाळेचा परिणाम, शेतकऱ्यांची पावले वळली शेतीकडे

पोकरा शेतीशाळेचा परिणाम, शेतकऱ्यांची पावले वळली शेतीकडे

सध्या नैसर्गिकरित्या शेतीच्या बांधावर उपलब्ध असलेल्या कडूनिंबाच्या निंबोळीचा अर्क पाच टक्के कसा तयार करावा, दशपर्णी अर्क तयार करून फवारणी करावी, फवारणी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, यासाठी अंगभर कपडे घरच्या घरी पोत्यापासून तयार करावे, त्यामुळे रासायनिक कीटकनाशके अंगावर पडणार नाहीत, याचेही प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. शेतीशाळेला पोकराचे समन्वयक शिवराज पारशेट्टी, सरपंच अंकुश सोनकांबळे, कल्पना बिरादार, शिवानंद बिरादार, उत्तम सोनकांबळे, माणिकराव बिरादार यांच्यासह महिला शेतकऱ्यांची प्रमुख उपस्थिती हाेती. महाराष्ट्र शासनाने राज्यातील काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांना शेतीबद्दल मूलभूत माहिती देऊन वारंवार बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज घेत, हवामानावर आधारित कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता यावे, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून खरीप आणि रबी हंगामातील आपल्या भागात अधिक उत्पन्न घेतल्या जाणाऱ्या पिकांची लागवड सोयाबीन, तूर आणि हरभरा पिकांची लागवड केली जाते. यासाठी पेरणीपूर्व पासून माती परीक्षण, बियाणे निवड, बीजप्रक्रिया, पेरणीपद्धत, बीबीएफचा वापर, सिंचन पद्धती, ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा वापर, एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रणासाठी जैविक, सेंद्रिय कीटक, रोगनाशके घरच्या घरी तयार करून फवारणी करणे, फवारणी करताना काळजी कशी घ्यावी, याबाबत जनजागृती, प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर पीक काढणी करताना घ्यावयाची काळजी, काढणीनंतर उत्पादित शेतमालाची योग्य साठवणूक, कच्च्या मालावर प्रक्रिया करून कच्च्या मालाचे मूल्यवर्धन कसे करता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढेल त्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. यासाठी गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर शेतीशाळेच्या माध्यमातून प्रात्यक्षिके केली जातात.

Web Title: As a result of Pokra farm, farmers turned to agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.