निर्बंध नावालाच; कोरोनाच्या उपाययोजनांकडे होतेय दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:18 IST2021-03-18T04:18:48+5:302021-03-18T04:18:48+5:30
शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रशासकीय इमारतीत विविध विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. मात्र या ठिकाणी प्रवेशद्वारावर ...

निर्बंध नावालाच; कोरोनाच्या उपाययोजनांकडे होतेय दुर्लक्ष
शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रशासकीय इमारतीत विविध विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. मात्र या ठिकाणी प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरचा वापर होत नाही. अनेकांचा विनामास्क वावर असून, विविध विभागांच्या कार्यालयातही फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांचा अवलंब करण्याच्या सूचना प्रशासनाकडून वेळोवेळी केल्या जात आहेत. मात्र त्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे. स्वत:ची व कुटुंबाची काळजी आवश्यक आहे.
चित्रपटगृह
शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी चित्रपटगृहे सुरू होती. मात्र सध्या कोरोनामुळे बहुतांश चित्रपटगृह बंद आहेत. ५० टक्के क्षमतेस परवानगी असली, तरी चित्रपटगृहांत पालन होत आहे.
लग्न समारंभ
जिल्ह्यात लग्न समारंभास केवळ ५० व्यक्तींना मुभा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पडत आहेत. या ठिकाणी नियमांचे पालन केले जात आहे.
अंत्यविधी
अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना परवानगी आहे. खेडेगावात अंत्यविधीसाठी गर्दी होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, अनेक ठिकाणी ठराविक अंतर पाळून अंत्यविधीसाठी लोक उपस्थित राहत आहेत.
कार्यालये
लातूर शहरातील शासकीय कार्यालयांत कोरोना नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. विनामास्क वावर वाढला असून, गर्दी होत आहे. मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंगचा अवलंब केला जात नाही.
गृह विलगीकरण
कोरोनाबाधित असलेल्या परंतु, लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्यास मुभा आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने स्वतंत्र नियमावली देण्यात आली आहे.