एक्स्प्रेस रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:36+5:302021-09-12T04:24:36+5:30

मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना... रेल्वे विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना माेठ्या प्रमाणावर प्रवाशांतून प्रतिसाद मिळत आहे. लातूर ...

Response of passengers to express train ..! | एक्स्प्रेस रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद..!

एक्स्प्रेस रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद..!

मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना...

रेल्वे विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना माेठ्या प्रमाणावर प्रवाशांतून प्रतिसाद मिळत आहे. लातूर रेल्वेस्थानकातून सुसाट असलेल्या लातूर ते मुंबई या मार्गावर तिकीट मिळत नसल्याचे प्रकार घडत आहेत. अनेकांना आठ दिवस आधीच प्रवासाचे नियाेजन करावे लागत आहे. या मार्गावर मुंबई आणि पुण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची माेठी गर्दी आहे. त्यापाठाेपाठ लातूर ते यशवंतपूर मार्गावरही अनेक प्रवासी वेटिंगवर आहेत. हैदराबाद ते हडपसर, काेल्हापूर-नागपूर, काेल्हापूर-लातूर-धनबाद रेल्वेलाही प्रवाशांचा माेठा प्रतिसाद आहे.

सध्या सुरु असलेल्या रेल्वे...

लातूर - मुंबई

लातूर - यशवंतपूर

नांदेड - पनवेल

काेल्हापूर - नागपूर

काेल्हापूर - धनबाद

हैदराबाद - हडपसर

हैदराबाद मार्गावर गर्दी कमीच...

लातूर रेल्वेस्थानकातून धावणाऱ्या सात एक्स्प्रेसपैकी हैदराबाद, लातूर ते यशवंतपूर मार्गावर प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समाेर आले आहे. त्या तुलनेत लातूर ते मुंबई, काेल्हापूर ते नागपूर या रेल्वे मार्गावर प्रवाशांचा माेठा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, नांदेड ते पनवेल रेल्वेलाही प्रवाशांची गर्दी आहे.

ना मास्क, ना साेशल डिस्टन्सिंग...

सध्या रेल्वे, बसस्थानकामध्ये प्रवाशांची माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत आहे. दरम्यान, काेराेना नियमांचे पालन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेकडून दिल्या जात आहेत.

तर काही प्रवाशांकडून मात्र ना मास्क, ना साेशल डिस्टन्सिंग पाळला जात नसल्याचे दिसून येत आहे. मास्कशिवाय प्रवास नाही, असा दंडक प्रवाशांना लावण्याची गरज आहे. एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी आपल्या तिकिटाचे आरक्षण केलेले असते. सध्याला पॅसेंजरसारखी एक्स्प्रेसमध्ये गर्दी नाही; मात्र काही प्रवाशांकडून मास्क, साेशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे समाेर आले आहे.

Web Title: Response of passengers to express train ..!