बसवकल्याण येथे आंदोलनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:22+5:302020-12-11T04:46:22+5:30

... रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी जळकोट : तालुक्यातील सोनवळा येथील शेतकरी गणेश मुसळे यांच्यावर रानडुकाराने हल्ला केल्याने ते गंभीर ...

Response to the agitation at Basavakalyan | बसवकल्याण येथे आंदोलनाला प्रतिसाद

बसवकल्याण येथे आंदोलनाला प्रतिसाद

...

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

जळकोट : तालुक्यातील सोनवळा येथील शेतकरी गणेश मुसळे यांच्यावर रानडुकाराने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी मदत देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा वन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सोनवळा येथील गणेश मुसळे हे १ डिसेंबर रोजी सकाळी शेतात गेले होते. तेव्हा त्यांना रानडुकाराने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

...

युवकांनी वाचविले हरणाचे प्राण

निलंगा : येथील एका जुन्या विहिरीत मंगळवारी सकाळी हरणाचे पाडस पडले होते. ही घटना ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या छायाबाई किवडे यांनी पाहिली. त्यांनी मदतीसाठी हाक दिली असता तेथील युवक जमा झाले. नवाज लोणारे याने दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून त्या पाडसाला बाहेर काढले. त्यासाठी त्यांना निसार बेडगे, अब्दुल गणी तांबोळी, दीपक गुरव, कमल सावळकर यांनी मदत केली. हे पाडस वनविभागाचे वनसेवक सुभाष तांबाळे यांच्याकडे देण्यात आले.

...

डीवायएसपी जवळकर यांचा उदगीर येथे सत्कार

उदगीर : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर यांची बदली झाल्यानंतर ते कार्यमुक्त झाल्याने त्यांचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सत्कार करून निराेप देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव एडके, कर्मचारी संतोष दुबुळगुंडे, प्रदीप घोरपडे, श्रीकृष्ण चामे आदी उपस्थित होते.

...

Web Title: Response to the agitation at Basavakalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.