लातुरात खेळाडू, पालक, प्रशिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST2021-08-22T04:23:27+5:302021-08-22T04:23:27+5:30
गोवा येथे नुकतीच सहावी राष्ट्रीय स्पर्धा झाली. या स्पर्धेत लातूरचे कैवल्य शेट्टे, विरेश चौधरी, केशव काकडे, राधा गोरे, गौरंग ...

लातुरात खेळाडू, पालक, प्रशिक्षकांचा सत्कार
गोवा येथे नुकतीच सहावी राष्ट्रीय स्पर्धा झाली. या स्पर्धेत लातूरचे कैवल्य शेट्टे, विरेश चौधरी, केशव काकडे, राधा गोरे, गौरंग पवळे, आदित्य नागरगोजे हे खेळाडू सहभागी झाले होते. कैवल्य शेट्टे व गौरंग पवळे याने धावण्याच्या शर्यतीत प्रत्येकी एक सुवर्णपदक, विरेश चौधरी याने लांब उडी क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, केशव काकडे याने उंच उडी क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, राधा गोरे हिने भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर आदित्य नागरगोजे याने धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
या खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक समाधान बुरगे, शैलेश पाडुळे, दिनकर क्षीरसागर यांचाही आमदार धीरज देशमुख यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पैलवान प्रसाद शिंदे, प्रवीण पाटील, मुरुडचे उपसरपंच आकाश कणसे, अंगद पवळे, जयश्री पवळे, विजय चौधरी, रमेश काकडे, प्रदीप बनकर, ज्योती शेट्टे, जमुना भालेराव, धनंजय नागरगोजे यांची उपस्थिती होती.