कोरोनामुक्तीचा संकल्प करून जी.व्ही.नी केले गुरुचरित्राचे पारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:54+5:302021-05-06T04:20:54+5:30
गुरुचरित्राचे पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प सोडूनच गुरुचरित्र वाचण्यासाठी सुरुवात करावी लागते. हैदराबादचे जी.व्ही. कुलकर्णी (गणपत व्यंकटेश कुलकर्णी) यांनी ...

कोरोनामुक्तीचा संकल्प करून जी.व्ही.नी केले गुरुचरित्राचे पारायण
गुरुचरित्राचे पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प सोडूनच गुरुचरित्र वाचण्यासाठी सुरुवात करावी लागते. हैदराबादचे जी.व्ही. कुलकर्णी (गणपत व्यंकटेश कुलकर्णी) यांनी श्री दत्तात्रयांचे स्थान असलेला हत्तीबेटाचा गड गाठून येथील दत्त मंदिरात तीन दिवस गुरुचरित्राचे पारायण केले. सांगता सोमवारी झाली.
जी.व्ही. कुलकर्णी हे जी.व्ही. नावाने ओळखले जातात. हैदराबाद येथे वैदिक धर्म प्रकाशिका हायस्कूलमधून ते १९९७ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर, त्यांनी देशातील सर्व दत्तस्थानी जाऊन गुरुचरित्राचे पारायण केले. द्वा.वा. केळकर, सुनील चिंचोळकर, श्रीकृष्ण देशमुख, मारोतीबुवा रामदासी अण्णाबुवा काळगावकर यांचा सत्संग व प्रेरणा सतत मिळत गेल्यामुळे अध्यात्म क्षेत्रात सतत कार्यमग्न असून, हे २८४वे पारायण झाल्याचे जी.व्ही. म्हणाले.
जी.व्ही. हे कला शिक्षक असल्यामुळे त्यांचे हस्ताक्षर फारच सुंदर आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आपल्या आप्तेष्टांना दरवर्षी २५० ते ३०० रंगीत ग्रीटिंग कार्ड स्वतः लिहून पाठवितात. त्यांनी हस्ताक्षरात गुरुचरित्र लिहिले आहे. ते त्यांनी हत्तीबेटासाठी अर्पण केले.