शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य
2
आनंदाची बातमी! चांदी घसरली, 2000 रुपयांनी कोसळली! सोनंही 600 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 'लेटेस्ट रेट'
3
मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...
4
सफरचंदावर का लावतात स्टिकर?; ९९% लोकांना माहीत नाही सत्य; किमतीशी नाही, आरोग्याशी संबंध
5
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
6
'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!
7
करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS
8
कपूर किंवा बच्चन नाही, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया!
9
"दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", Virat Kohli समोर चाहत्यांची घोषणाबाजी
10
"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
11
याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹१५ च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल
12
सारा अली खानसोबत ब्रेकअपनंतर सिंगल आहे कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं नाव
13
Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
14
अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
15
अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा
16
PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?
17
एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!
18
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव
19
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर
20
वर्ल्ड कपचे सामने संपले! न्यूयॉर्क येथील स्टेडियम तोडण्यासाठी बुलडोझर पोहोचले, पण का?

निवासी डॉक्टर बेमुदत संपावर; विविध मागण्यांसाठी आंदोलन, अत्यावश्यक आरोग्यसेवा देणे सुरु

By हरी मोकाशे | Published: February 22, 2024 8:51 PM

डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी ही एक महत्त्वाची मागणी

हरी मोकाशे, लातूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी, यासह अन्य विविध मागण्यांसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी गुरुवारी सायंकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून दैनंदिन आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत खात्यात जमा करण्यात यावे, निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी, निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन हे केंद्रीय संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे आदी मागण्यांसाठी मार्डने ७ फेब्रुवारी रोजी संप पुकारला होता. दरम्यान, राज्य शासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे संप मागे घेण्यात आला. १५ दिवस उलटले तरी अद्यापही मागण्यांची पूर्तता न झाल्याने निवासी डॉक्टरांनी आक्रमक पावित्रा घेत गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपासून बेमुदत संप सुरु केला आहे. आंदोलनात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मार्डचे अध्यक्ष डॉ. महेश हामंद, उपाध्यक्ष डॉ. अखिल देव, सहउपाध्यक्ष ऋषभ सिंह, सचिव डॉ. नारायण काबरा, डॉ. सुशांत देशमुख, डॉ. प्रतीभा होनशेट्टे, संयुक्त सचिव डॉ. शुभम कांबळे आदी सहभागी झाले आहेत.काळ्या फिती लावून कामकाज...गुरुवारी सायंकाळी मार्डच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली आहे. शासनाने तात्काळ मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली. १८० डॉक्टर आंदोलनात...विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील १८० निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप सुरु केला आहे. निवासी डॉक्टर केवळ अत्यावश्यक सेवा तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात सहभागी होणार आहेत. नियमित रुग्ण तपासणी, बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण तपासणी करणार नाहीत. तसेच सध्या विद्यापीठीय परीक्षा सुरु आहेत. त्यावरही आमचा बहिष्कार आहे.- डॉ. महेश हामंद, अध्यक्ष, मार्ड.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप