सिकंदरपूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच माधव गंभीरे यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या पॅनलने ५ विरुद्ध ४ अशा फरकाने बहुमत मिळविले. त्यानंतर बुधवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक मतदान पद्धतीने झाली. यात सरपंचपदी रेशमा गंभीरे व उपसरपंचपदी पिराजी इटकर विजयी झाले आहेत. बैठकीला नूतन सदस्य उद्धव गंभीरे, बाळूबाई इटकर, रामाबाई लष्करे, शिवाजी देशमुख, मंजुषा सुरवसे, गजानन बोयणे, मंगलबाई ताटे यांची उपस्थिती होती. निवडीनंतर पॅनल प्रमुख माधव गंभीरे, बंकटराव देशमुख, दिलीप गंभीरे, श्रीमंत गरगटे, तानाजी कोकाटे, गहिनीनाथ बोयणे, दिगंबर कदम, शंकर इटकर, सुभाष लष्करे, पांडुरंग ताटे, उस्मान शेख, रतिश्वर लाळे, अशोक ताटे, राजकुमार अडसुळे आदींच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी मिरवणूक काढून सरपंच, उपसरपंच व नूतन सदस्यांचा सत्कार केला.
सिकंदरपूरच्या सरपंचपदी रेशमा गंभीरे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST