उदगीर तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:15+5:302021-02-05T06:23:15+5:30
उदगीर येथील श्यामार्य कन्या विद्यालयात ॲड. विक्रम संकाये यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते-पंडित, गिरीश मुंडकर, डॉ. ...

उदगीर तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
उदगीर येथील श्यामार्य कन्या विद्यालयात ॲड. विक्रम संकाये यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते-पंडित, गिरीश मुंडकर, डॉ. देवेंद्र बिरादार आदी उपस्थित होते.
येथील श्यामलाल प्राथमिक विद्यालयात गिरीश मुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापक विवेक उगिले, अंतेश्वर बिरादार, अरुणा उदगीरकर, अनिता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
येथील एम. व्ही. पाटील सीबीएसई पब्लिक स्कूल येथे संस्थेचे उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी कमांडंट कमांडर बी. के. सिंह, प्राचार्य वसंत कुलकर्णी, गणेश हुडे उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा वासुदेव यांनी केले. आभार सचिन बनाळे यांनी मानले.
येथील श्री स्वामी समर्थ बीसीए व डीएमएलटी कॉलेज येथे ध्वजारोहण झाले. यावेळी संस्था सचिव अविज धुप्पे, प्राचार्य कुणाल एमेकर, प्रा. विभा कुलकर्णी, प्रा. योगिता बरुरे, प्रा. पूजा बापुरे, प्रा. विशाखा किवंडे आदी उपस्थित होते.
तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी चेअरमन बाळासाहेब जाधव, पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, संस्था सदस्य एम. व्ही. स्वामी, पोलीसपाटील विश्वास नरले, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर पाटील, गटसचिव रामकिशन जाधव, नूतन ग्रामपंचायत सदस्य राजकुमार कांबळे, जगदीश जाधव, विनायकराव पाटील, जिजाबाई पेरके, डी. आर. जाधव आदी उपस्थित होते.
तालुक्यातील वाढवणा बु. येथील यशवंत विद्यालयात प्राचार्य शंकरराव बुड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जलिलखाँ गोलंदाज, संगम अष्टुरे, सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव सुकने, माजी सैनिक गवळे, पर्यवेक्षक प्रा. वीरभद्र बिरादार, प्रा. मनोजकुमार माने, किशन ढोकाडे, प्रा. संगम बिरादार, प्रा. रमेश केंद्रे, प्रा. उमाकांत कांबळे, प्रा. अतुल जाधव, प्रा. अभिजित डांगे, प्रा. रविकिरण कांबळे, प्रा. शफिउल्ला खान, प्रा. दिलदार पठाण, प्रवीण भिंगोले, सुरेश देशमुख, प्रा. पल्लवी इंद्राळे, कटेवार, प्रा. संदीप तोडकर, प्रा. सुभाष पासमे, प्रा. बब्रुवान वलसे, मंगेश सरदार, एन. एम. जहागीरदार, आनंद जाधव, प्रा. जयराज बुर्से, संदीप उडतेवार, संतोष सोमासे, नवनाथ मोरे, अरुण चंदाले, ज्ञानेश्वर बऱ्हाळे, शौकत शेख, राहुल जाधव आदी उपस्थित होते.